esakal | रस्‍त्‍यावर बस थांबवून चालक- वाहकाने बुजविला खड्डा
sakal

बोलून बातमी शोधा

bus driver

दोन वाहने चालवणे जिकिरीचे झाले होते. वाहन नेण्यावरून गाड्यांच्या चालकात नेहमी वाद होत असत. केव्हाही वाहन उलटू शकेल अशी स्थिती निर्माण झाली होती.

रस्‍त्‍यावर बस थांबवून चालक- वाहकाने बुजविला खड्डा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रावेर (जळगाव) : रावेर - पाल रस्त्यावर मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानकडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावर प्रवासी बस, जीप आणि अवजड वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. याच रस्‍त्‍यावरून नेहमी जाणाऱ्या बस चालक- वाहकाने रस्‍त्‍यावर गाडी थांबवत धोकेदायक खड्डा बुजविला. 
रावेर ते पाल हे २५ किलोमीटरचे अंतर आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान, मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे अवजड वाहनांसह प्रवासी वाहतूकदार, प्रवासी त्रस्त झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण झाले होते. मात्र, सहा महिन्यातच या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे. या कामाची चौकशी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. 

संपुर्ण वाहतूक एकाच रस्‍त्‍याने
इच्छापूर- बऱ्हाणपूर- इंदूर या मार्गाची मोठी दुरवस्था झाली असल्याने मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, जम्मू आणि काश्मीरकडे जाणारे सुमारे ४० टन वजनाचे मालवाहू ट्रक, कंटेनर आता पालमार्गे जातात. यामुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. सध्या भुसावळ- सावदा- खिरोदा- पालमार्गे चितोडगड रस्त्याचे काम सुरू आहे. ते अपुरे असल्याने त्या मार्गावरील वाहतूकही कुसुंबा- लालमातीमार्गे पालकडे सुरू आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण 
खड्ड्यांना कंटाळून रावेर आगाराचे बसचालक रफिक शेख, वाहक बाबू तडवी व अन्य दोन प्रवाशांनी मिळून रविवारी या रस्त्यावरील कुसुंब्याजवळील वळणापुढे असलेला भलामोठा खड्डा बुजवला. या ठिकाणाहून दोन वाहने चालवणे जिकिरीचे झाले होते. वाहन नेण्यावरून गाड्यांच्या चालकात नेहमी वाद होत असत. केव्हाही वाहन उलटू शकेल अशी स्थिती निर्माण झाली होती. अखेर या रस्त्यावरील खड्डयाजवळील दगड, गोटे, विटा गोळा करून त्यांनी या खड्ड्यात टाकून एक खड्डा बुजविला. पण या रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत, त्यांचे काय करावे, असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. 

loading image