ढाब्‍यावरचे जेवण अन्‌ काही अंतरावर झाले होत्‍याचे नव्हते; अभोडा गावात स्‍मशान शांतता

accident
accident
Updated on

रावेर (जळगाव) : व्हॅलेंटाईन डे नंतरची पहाट तालुक्यातील अभोडा, रावेर, विवरा आणि केऱ्हाळे या गावात शोककळा पसरवून गेली. यावल तालुक्‍यातील किनगाव नजीक झालेल्या भीषण दुर्घटनेत तालुक्यातील अभोडा येथील एकाच कुटुंबातील १०, दुसऱ्या कुटुंबातील २ असे १२ तर रावेर येथील दोन आणि केऱ्हाळा येथील एका जणाचा मृत्यू या दुर्घटनेत ओढवला. अभोडा येथील अशोक वाघ यांच्या वाघ कुटुंबातील चार जण, त्यांच्या दोन बहिणी, एक भाचा, दोन भाच्या आणि एक भाचेजावई यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. यामुळे अभोडा गावात आज चूल पेटली नाही.

अशी घडली घटना
केऱ्हाळा (ता.रावेर) येथील पपईचे व्यापारी आमीन शाह उस्मान शाह यांनी रावेर येथील शेख फय्याज शेख रशीद यांची आयशर गाडी भाड्याने घेतली. शनिवारी (ता. १३) गाडीत चालक, २ सहकारी, पपईचे दूध काढणारे आणि पपई तोडणारे मजूर, त्यांची मुले अशा एकूण २२ जणांसह गाडी धुळे जिल्ह्यातील साक्री येथे रवाना झाली. तेथून रविवारी (ता. १४) पपई घेऊन परत येताना धुळे येथील ढाब्यावर रात्री उशिरा त्यांनी जेवण केले आणि रात्री १२:४० च्या सुमारास किनगाव- साकळी दरम्यान गाडीच्या स्टेअरिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि भरधाव वेगाने धावणारी आयशर ट्रक उलटली. गाडीने दोन पलटी खाल्ल्या. ट्रकच्या केबिनमधील चालक गंभीर जखमी झाला; तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. मात्र मागे पपईवर बसलेले आणि मध्यरात्र असल्यामुळे झोपेत असलेले १९ जण दबले जाऊन त्यापैकी १५ जण जागीच ठार झाले, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

दहा वर्षांचा समाधान बचावला
अभोडा येथील अशोक वाघ यांचा मुलगा समाधान (वय १० वर्षे) हा चारच दिवसांपूर्वी त्याच्या नाशिक येथील आत्याकडे सुट्टी असल्‍याने गेला होता. तो इथे असता तर वडिलांबरोबर तो पण या ट्रकमध्ये गेला असता. पण तो नाशिकला असल्याने सुदैवाने बचावला.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Marathi News Esakal
www.esakal.com