दिल्‍लीच्या राजपथावर जळगावची ‘समृद्धी’

राजेश सोनवणे
Wednesday, 27 January 2021

दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर पथसंचलन होत असते. या पथसंचलनात जळगावच्या मु. जे. महाविद्यालयातील बी.कॉमच्या अंतिम वर्षाची विद्यार्थीनी तसेच एनसीसी युनिटची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संत हिने ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषवले आहे. 

जळगाव : मु. जे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी समृद्धी हर्षल संत हिने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर झालेल्या एनसीसीच्या संचलनात देशाचे नेतृत्व केले. तिने 'ऑल इंडिया परेड कमांडर' म्हणून पद भूषविले. यामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर पथसंचलन होत असते. या पथसंचलनात जळगावच्या मु. जे. महाविद्यालयातील बी.कॉमच्या अंतिम वर्षाची विद्यार्थीनी तसेच एनसीसी युनिटची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संत हिने ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषवले आहे. 

२६ छात्र सैनिकांमध्ये समृद्धी एकमेव 
एनसीसी महाराष्ट्र डायरेक्टोरेटमधून केवळ २६ छात्र सैनिकांची निवड करण्यात आली होती. अमरावती एनसीसी ग्रुप आणि १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनमधून समृद्धी हिची एकमेव छात्र सैनिक म्हणून निवड झाली होती. समृद्धीने भुषविलेल्‍या या पदामुळे जळगावच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबद्दल केसीईचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन, प्राचार्य प्रा. एन. एन. भारंबे आदींनी समृद्धीचे अभिनंदन केले. लेफ्टनंट डॉ. योगेश बोरसे, सी.टी.ओ. गोविंद पवार, सी.टी.ओ. ज्योती मोरे, सुभेदार मेजर कोमल सिंग आणि पी.आय. स्टाफ यांनी समृद्धीच्या परेड सराव करून घेतला.

समृद्धीला मिळाला बहुमान
प्रजासत्‍ताक दिन (26 जानेवारी) निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. या परेडमध्ये सहभागी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यात सहभागी होण्याचा बहुमान जळगावच्या समृद्धी संतला मिळाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news republic day delhi parade samrudhi sant all india parade comander