esakal | पंधरा हजार मजुरांचे ३५ लाख रुपये थकीत 

बोलून बातमी शोधा

rojgar hami yojana}

शासनाच्या माध्यमातून पंचायत समिती, तालुका कृषी विभाग, वन विभाग, व सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून गोरगरीब, बेरोजगारांना मजुरी मिळावी, या साठी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे दिली जातात.

पंधरा हजार मजुरांचे ३५ लाख रुपये थकीत 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रावेर (जळगाव) : तालुक्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत पंधरा हजार मजुरांच्या कामाचे सुमारे ३५ लाख रुपये दोन महिन्यांपासून थकल्याने या योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मजुरांनी केली आहे. 
रावेर तालुक्यात शासनाच्या माध्यमातून पंचायत समिती, तालुका कृषी विभाग, वन विभाग, व सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून गोरगरीब, बेरोजगारांना मजुरी मिळावी, या साठी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे दिली जातात. यात वृक्ष संवर्धन, रोपवाटिका, घरकुल, संरक्षकभिंती, गोठे आदी ठिकाणी कामे देऊन बेरोजगारांना २३८ रुपये रोज रोजगार दिला जातो. या कामाचे पेमेंट दर पंधरा दिवसांनी दिले जाते. मात्र, या वर्षी सात जानेवारीपासून तालुक्यातील पंधरा हजार मजुरांचे सुमारे ३५ लाख रुपये शासनाकडे थकलेले आहे. यामुळे तालुक्यातील मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. यामुळे मजूर वर्ग हताश झाला आहे. महिनाभरापासून ग्रामीण भागातील मजूर येथील संबंधित विभाग व पंचायत समिती कार्यालयात चौकशी करीत हा निधी जिल्हा व राज्यात कुठेही अद्यापही शासनाकडून प्राप्त झाला नाही. पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून निधी मिळून आणावा व रोजगार हमीच्या मजुरांची उपासमार थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.