ग्रामीण मार्गासह शेतरस्त्यांचे भाग्य उजळणार! 

राजेश सोनवणे
Thursday, 28 January 2021

शासनाकडून जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त झाले असून, तसे प्रस्ताव मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती लालचंद पाटील यांनी दिली. 
 

जळगाव : दर वीस वर्षांनी बदलणारा रस्ते विकास कार्यक्रम २०२१-२०४१ साठी जाहीर झाला असून, यात ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य किंवा अधिकाऱ्यांना रस्ते सुचवून त्या रस्त्यांचे भाग्य उजळविण्याची संधी ग्रामस्थांना मिळणार आहे. यासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त झाले असून, तसे प्रस्ताव मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती लालचंद पाटील यांनी दिली. 
जिल्‍हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील व सभापतींच्या उपस्थितीत यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. यात रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत गावाला जोडणारे शिवरस्ते, शेतरस्ते, वहिवाट ज्यांना भूसंपादनाची गरज नाही, असे रस्ते प्रस्तावित करण्यात येणार आहेत. 

रस्‍ते सुचविल्‍यास त्‍याचेही डांबरीकरण
कोणत्याही ग्रामस्थांनी वापराचे रस्ते संबंधित यंत्रणेला सुचविल्यास या रस्त्याचे भाग्य उजळून त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळून जिल्हा परिषदेअंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे. त्यामुळे गावे जोडली जाणार आहेत. शेतरस्ते सुस्थितीत येऊन मोठी अडचण दूर होऊ शकेल. मात्र, यात लोकसहभाग अधिक आवश्‍यक असल्याचे उपाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news rural aria road devlopment zilha parishad