esakal | साठा संपला लसीकरण थांबले; नागरिक हैराण अन्‌ ज्येष्ठांची फरपट
sakal

बोलून बातमी शोधा

co vaccine

केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याविषयी आदेश दिले असले, तरी येथे लसच उपलब्ध नसल्यामुळे नवीन व्यक्तींचे लसीकरण बंद पडले आहे. रुग्णालयात चकरा मारूनही लस आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

साठा संपला लसीकरण थांबले; नागरिक हैराण अन्‌ ज्येष्ठांची फरपट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

यावल (जळगाव) : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात टाळेबंदीला व्यापारी वर्गातून जबरदस्त विरोध होत असून, लसीकरण वाढविणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. मात्र, लसीचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याचे वास्तव सर्वत्र आहे. लसपुरवठ्यावरून राज्य व केंद्र सरकारमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असून, यात मात्र सर्वसामान्य जनतेचा जीव जातोय. 
येथील ग्रामीण रुग्णालयात कोव्हिशील्ड लस शिल्लक नसल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याविषयी आदेश दिले असले, तरी येथे लसच उपलब्ध नसल्यामुळे नवीन व्यक्तींचे लसीकरण बंद पडले आहे. रुग्णालयात चकरा मारूनही लस आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

आतापर्यंत ३९०० जणांना डोस
ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत तीन हजार ९०० जणांसाठी कोव्हिशील्ड लस मिळाली आहे. त्यांपैकी तीन हजार ३७ जणांना पहिला डोस, तर ८५८ जणांना लसीचा दुसरा डोस मिळून एकूण तीन हजार ८९५ जणांना देण्यात आला आहे. यात अजून दोन हजार १७९ जणांना दुसरा डोस देणे बाकी आहे आणि कोव्हिशील्ड लसीची मागणी करूनही ती जिल्ह्यावरून उपलब्ध होत नाहीय. कोव्हॅक्सिन लसीचे आजअखेरपर्यंत केवळ ७०० डोस मिळाले आहेत. त्यांपैकी ४०० जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. आता उर्वरित शिल्लक ३०० डोस ज्यांनी प्रथम डोस घेतला आहे, त्यांनाच देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाची ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची घोषणा लसपुरवठ्याअभावी हवेत विरणार आहे, असेच म्हणावे लागेल. लस घेणाऱ्यांत ६० वर्षांवरील ज्येष्ठ व गंभीर आजार असणाऱ्या व्यक्ती जास्त आहेत, अशा वेळी शासनाने किमान ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून लसीचा विशिष्ट कोटा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात यावा. 

कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिन लसीची मागणी केली असून, ती येताच ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील व्यक्तींना देण्यात येईल. 
-डॉ. बी. बी. बारेला, वैद्यकीय अधिकारी, यावल 

loading image