esakal | कुटूंब स्‍तब्‍ध अन्‌ निशब्‍द..महिनाभरात होत्‍याचे नव्हते झाले; कुटुंबातील सहावा मृत्‍यू

बोलून बातमी शोधा

corona death
कुटूंब स्‍तब्‍ध अन्‌ निशब्‍द..महिनाभरात होत्‍याचे नव्हते झाले; कुटुंबातील सहावा मृत्‍यू
sakal_logo
By
टिम इ सकाळ

सावदा (जळगाव) : गेल्या दीड महिन्यात कोरोनामुळे परदेशी कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्‍या पाठोपाठ आता आणखी एका महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. या कुटुंबातील प्रतिभा कैलास परदेशी (वय ४८) यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान हॉस्पिटलच्या दुर्लक्षानेच आईचा मृत झाल्याचा आरोप महिलेच्या मुला- मुलींनी केला असून जोपर्यंत हॉस्पिटलवर कारवाई होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला.

कोरोनाने जीव घेण्याची मर्यादा आता ओलांडली आहे. आता बस कर देवा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या महिन्यात अवघ्या पंधरा दिवसात परदेशी कुटुंबातील पाच जण कोरोनाचे बळी गेले आहेत. तर एक महिला गेल्या दीड महिन्यापासून जळगाव येथील सारा खासगी रूग्‍णालयात उपचार घेत जगण्यासाठी झुंज देत होती. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते की काय या महिलेचा देखील पतीच्या निधनानंतर मृत्यू ओढवला. सहा भावांचे व ३५ जणांच्या या परदेशी कुटुंबातील एकूण सहा जण एकाच वर्षात काय पण एकाच महिन्यात तेही पंधरा दिवसात मृत्यू पावल्याने परदेशी कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना करवत नाही.

आईने तर जेवणपण केले..

आमच्या आईची तब्येत तशी सुधारत होती. त्यांनी मृत्यू पूर्वी जेवण पण घेतले. पण हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी हे उपचारासाठी दुर्लक्ष करीत होते. याचं हॉस्पिटलमध्ये काही दिवसापूर्वी आमचे काका पण होते; त्यांचे पण निधन झाले. या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. असे नातेवाईकांनी आरोप केला.

..तर एकच रुग्ण कसा दगावेल

प्रतिभा परदेशी यांचे फुप्फुस संपूर्णतः फायब्रॉसीस झालेले होते. गेल्या ४० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. दिवसाला ३० लीटर ऑक्सिजन दिला जात होता. आत्तापर्यंत संपूर्ण कुटुंबीय उपचारावर आनंदीत होते. सेंट्रलाईज्ड ॲटोमॅटीक यंत्रणेद्वारे एकाच पाईप लाईनमधून ७ व्हॅटीलेटरर्ससह २० इतर रुग्णांना ऑक्सिजन सुरू होता. त्यामुळे संबंधित मृत महिलेचेच ऑक्सिजन कसे बंद असा युक्तिवाद कोविड सेंटरच्या संचालक मंडळाकडून करण्यात आला आहे.