
लोढा यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी श्री.वानखेडे म्हणाले, की नेत्यांवर असले आरोप सहन केले जाणार नाही,
सावदा (जळगाव) : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर बेछूट व बिनबुडाचे आरोप करणाऱ्या प्रफुल्ल लोढा यांचा येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पुतळा जाळून व घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीचे नेते राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
येथील बनाना सिटी शिल्पाजवळ राष्ट्रवादीचे नगरसेवक वानखेडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, फिरोज खान पठाण, सिद्धार्थ बडगे, किशोर बेंडाळे, मीनाक्षी कोल्हे, विजया जावळे, रेखा वानखेडे, सुभद्रा बडगे, चारुदत्त वानखेडे, हरी परदेशी, साईराज वानखडे, प्रसाद वानखेडे, विजय तायडे, गौरव वानखेडे, प्रतीक कोल्हे आदींनी लोढा यांच्या पुतळ्याला काळे फासून चपलांनी मार देऊन दहन केले. या वेळी लोढा यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी श्री.वानखेडे म्हणाले, की नेत्यांवर असले आरोप सहन केले जाणार नाही, पक्ष खडसे यांच्या पाठीशी आहे आणि राहील. दरम्यान, लोढा यांचा पुतळादहन करणाऱ्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.