esakal | जळगाव जिल्ह्यातील चारशे शाळा ‘तंबाखू मुक्त’
sakal

बोलून बातमी शोधा

tobacco free school

जळगाव जिल्ह्यातील चारशे शाळा ‘तंबाखू मुक्त’

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : तंबाखूच्या जीवघेण्या व्यसनाविरोधात (tobacco free) जिल्हा प्रशासन व सामाजिक संस्थांनी राबविलेल्या अभियानात गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील तीन हजारांपैकी चारशे शाळा (School) तंबाखूमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. (schools in jalgaon district tobacco free)

आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन, जन मानवता फाऊंडेशन, चोपडा, साने गुरुजी फाऊंडेशन, अमळनेर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवित आहे. जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शनाखली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचे देखरेखीखाली सलाम मुंबई फाऊंडेशनच्या सहकार्याने कसोशीने अभियान राबविले जात आहे.

३९२ शाळा तंबाखूमुक्त

जळगाव जिल्ह्यात एकूण ३ हजार २८५ शाळा आहेत, ज्यातील एकूण ६७७ शाळा सलाम मुंबई फाऊंडेशन ॲपवर रजिस्टर झाले आहे. यातील ३९२ शाळांना तंबाखू मुक्त घोषित करण्यात आले आहे. तंबाखू मुक्त शाळा उपक्रमात पारोळा व भडगांव तालुका आघाडीवर आहेत. नवीन निकषानुसार शाळा तंबाखू मुक्त करण्याच्या उपक्रमास जानेवारी, २०२१ मध्ये सुरवात करण्यात आली आणि ३ महिन्यात शाळांनी विशेष कामगिरी केली.

यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी. एन. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, शिक्षणधकारी उपशिक्षणाधिकारी, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संपदा गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभत असल्याची माहिती जिल्हा तंबाखू नियंत्रण सल्लागार डॉ. नितिन भारती यांनी दिली.

अशी आहे आकडेवारी

एकूण शाळा : ३ हजार २८५

सलाम मुंबई फाउंडेशन ॲपवर रजिस्टर : ६७७

तंबाखूमुक्त शाळा : ३९२