esakal | पाचोऱ्याच्या रिजवानकडे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे नेतृत्व

बोलून बातमी शोधा

cricket rixvan pathan

क्रिकेटच्या राष्ट्रीयस्तरावरच्या स्पर्धेसाठी खानदेशाला नेतृत्वाचा मान मिळाला असून पाचोरा येथील तडफदार फलंदाज महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. 

पाचोऱ्याच्या रिजवानकडे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे नेतृत्व
sakal_logo
By
राजेश सोनवणे

पाचोरा (जळगाव) : महाराष्ट्र टि-१० असोसिएशनच्या संघासाठी महाराष्ट्राच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्र संघाचे नेतृत्व पाचोरा येथील रिजवान पठाणकडे देण्यात आले आहे. येत्‍या ४ एप्रिलपासून स्पर्धेचे सामने दिल्ली व ग्रेटर नोएडा याठिकाणी खेळले जाणार आहेत.
दिल्ली येथील टी १० असोसिएशनतर्फे उत्तर प्रदेशातील नोएडा येथे होणाऱ्या स्पर्धेत एकूण पंधरा सामने दिवस- रात्र खेळले जाणार आहे. या लीग सामन्यांमध्ये महाराष्ट्र संघासोबतच दिल्ली, पूर्वांचल, उत्तरप्रदेश, जम्मू- काश्मीर येथील संघाचा सहभाग आहे. क्रिकेटच्या राष्ट्रीयस्तरावरच्या स्पर्धेसाठी खानदेशाला नेतृत्वाचा मान मिळाला असून पाचोरा येथील तडफदार फलंदाज महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. 

ऑलराउंडर खेळाडू म्‍हणून ओळख
रिजवान एक आक्रमक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असून त्‍याच्या कामगिरीच्या आधारावर असोसिएशनने त्याच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा दिली आहे. रिजवान उजव्या हाताचा फलंदाज व गोलंदाज म्हणून देखील यशस्वी ठरला आहे. या अगोदर त्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. 

असा आहे संघ
महाराष्ट्राच्या टी- १० संघात रिझवान पठाण (कर्णधार), आकाश गौतील, इश्क शेख, मिथलेश गुनेरिया, दिनेश यादव, डेव्हिड सहारे, विकी रेवातकर, दीपक ठकराण, गुरुप्रीत सिंघ, विश्वेश्वर सिंघ, गुरुप्रीत गिल, अन्वर संकेत, सुरेश हर्षल, इमरान अली, अनमोल दिव्यकृष्णा यांचा समावेश असून अनुभवी क्रिकेटपटू जयकुमार बोराडे संघाचे प्रशिक्षक आहेत.