esakal | राज्यात १०२ लाख टन साखरेचे उत्पादन; ऊस गाळप अंतिम टप्प्यात  
sakal

बोलून बातमी शोधा

sugar produced

हंगामाच्या सुरवातीला राज्यातील ९५ सहकारी आणि ९४ खासगी कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. त्यापैकी ११० कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.

राज्यात १०२ लाख टन साखरेचे उत्पादन; ऊस गाळप अंतिम टप्प्यात  

sakal_logo
By
बाळकृष्ण पाटील

गणपूर (जळगाव) : राज्यातील यावर्षीचा ऊस गाळप हंगाम उत्तरार्धात आला असून राज्यातील ११० कारखान्यांचे गाळप आटोपले आहे. ५ एप्रिलपर्यंत राज्यातील १८९ साखर कारखान्यांनी ९७५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १०२ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. 
हंगामाच्या सुरवातीला राज्यातील ९५ सहकारी आणि ९४ खासगी कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. त्यापैकी ११० कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. राज्याचा साखर उतारा १०.४७ असला तरी कोल्हापूर विभागाचा सर्वाधिक म्हणजे ११.९९ टक्के तर पुणे विभागाचा १०.८९ इतका आहे. सोलापूर विभागाचा ९.३७ तर नगर विभागाचा ९.७६ इतका साखर उतारा आहे. औरंगाबाद विभागाचा ९.५८ तर नांदेड विभागाचा ९.९८ टक्के साखर उतारा असून अमरावतीचा ८.९३ साखर उतारा, नागपूर विभागाचा ९.३ टक्के आहे. 

खानदेशातील अशी आहे स्‍थिती
खानदेशात अजून ऊस तोड सुरू असून धुळ्यात शिरपूरमधील दत्तप्रभु ऍग्रोमध्ये लाखाच्या आसपास गाळप झाले असून नंदुरबारमधील सातपुडा तापीमध्ये ४ लाख ४६ हजार ३४५ मेट्रिक टन गाळप होऊन ४ लाख १४ हजार १३५ क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. तर नवापूरमधील आदिवासी सहकारी साखर कारखान्यात एक लाख १४ हजार ७४६ मेट्रिक टन ऊस गाळप झाला असून ९६ हजार ११५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आयान मल्टी ट्रेडमध्ये ३ लाख ७९ हजार ३९० मेट्रिक टनाचे गाळप होऊन ३ लाख ८४ हजार ५४५ क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. जळगावमधील संत मुक्ताबाई शुगरने ३ लाख ४६ हजार १२० मे. टन ऊस गाळप करून ३ लाख ४३ हजार २२० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. खानदेशात बऱ्याच भागात ऊसतोड आटोपली असली तरी अजून काही भागात ऊस उभा असून ऊसतोड संथ गतीने सुरू आहे. 

संपादन- राजेश सोनवणे

loading image