आईला म्‍हणाला मी येतो; पण आली त्‍याच्या मृत्‍यूची बातमी

railway track suicide
railway track suicide
Updated on: 

जळगाव : बाहेर फिरून येतो असे सांगून घरातून निघलेल्या दापोरा येथील २७ वर्षीय तरूणाने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली. सदर घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलीसात अकस्माम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दापोरे (ता. जळगाव) येथील विशाल शांताराम पवार (वय २७) हा तरूण आई व बहिणीसह राहतो. शिक्षणासह आईसोबत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. कर्जबाजारी असल्‍याने मागील काही दिवसांपासून तो तणावात होता. दरम्यान, सोमवारी (२९ मार्च) सायंकाळी सातच्या सुमारास बाहेर जावून येतो असे घरात सांगून दुचाकीने निघाला. 

रेल्‍वेसमोर घेतली उडी
विशाल हा तणावात होता. त्‍याने घरातून निघाल्‍यानंतर शिरसोली व दापोरे दरम्यानच्या परिसरात दुचाकी लावून धावत्‍या रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केली. गँगमन पांडे यांनी तत्काळ रेल्वे स्टेशन मास्तर यांना सांगितले. घटनास्थळी तालुका आणि एमआयडीसी पोलीस कर्मचारी पोहचले. मयताच्या खिशातील कागदपत्रांमुळे त्‍याची ओळख पटली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com