esakal | मुलांमध्ये कोरोनाची सौम्य असतील लक्षणे; भीती नको, काळजी घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Children corona symptoms

मुलांमध्ये कोरोनाची सौम्य असतील लक्षणे; भीती नको, काळजी घ्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा बालकांना (Children corona symptoms) अधिक धोका असल्याचे बोलले जात असले तरी मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे अगदीच अल्प व सौम्य स्वरूपातील (Coronavirus) असतील. त्यामुळे पालकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. थोडीही लक्षणे दिसली तरी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असा सूर बालरोगतज्ज्ञांच्या चर्चासत्रातून उमटला. (jalgaon-task-force-meet-Children-will-have-mild-corona-symptoms)

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात लसीकरणाला वेग;साडेपाच लाखांवर लशीचे दिले डोस

कोरोनाची दुसरी लाट सरत असताना तिसऱ्या लाटेत बालकांना धोका उद्‌भवण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे. या फोर्सच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील टीमचे नुकतेच ऑलनाइन चर्चासत्र झाले. त्यात तज्ज्ञांनी याबाबत मार्गदर्शन केले. यात राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. प्रमोद जोग, राज्य बालरोगतज्ज्ञ संघटनेचे सचिव नाशिकचे डॉ. सदाचार उजळंबकर, वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ केदार मालवतकर, जळगावचे डॉ. अविनाश भोसले यांच्यासह नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ सहभागी झाले.

डॉ. जयंत पांढरीकर यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाबाबत उद्देश स्पष्ट केला. मुंबईचे डॉ. किंजवडेकर, बालरोगतज्ज्ञ संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. उपाध्ये यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. सुनीता इंगळे आणि डॉ. वृषाली सरोदे (जळगाव) यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा: तब्बल..११३ दिवसानंतर जळगावची कोरोना रुग्ण संख्या शंभरीच्या आत !

तज्ज्ञांची मते...

बहुतांश म्हणजेच ९० टक्के मुलांमध्ये कोरोनाचा आजार सौम्य स्वरूपाचा राहणार असून, मुलांवर घरीच फॅमिली डॉक्टरकडून जुजबी औषधे घेऊन उपचार करावेत.

- डॉ. प्रमोद जोग, जळगाव

पालकांनी फक्त मुलांच्या थोड्या जास्त आजाराची लक्षणे जसे की खूप ताप, सुस्तपणा, श्‍वास गती जास्त होणे आदी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. केदार मालवतकर, जळगाव

कोरोनाची तीव्र लक्षणे फक्त २ टक्के मुलांमध्ये आढळतात. कोरोना होऊन गेल्यावर दोन ते तीन महिन्यांपर्यंत ती दिसू शकतात. त्यासाठी तज्ज्ञांकडून उपचाराबाबत मार्गदर्शन घ्यावे.

- डॉ. अविनाश भोसले, जळगाव

सतत लॉकडाउनमुळे सर्व मुले घरीच अडकली असल्याने त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडू नये, यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा.

- डॉ. सदाचार उजळंबकर, जळगाव