थर्टी फस्‍टला गुरूवार अन्‌ संचारबंदीची अडचण; पण चिंता नको, असे करा नियोजन

राजेश सोनवणे
Tuesday, 29 December 2020

थर्डी फस्टला मांसाहरी भोजनावर ताव मारणाऱ्यांची संख्या मोठी असते. यंदाही चिकन, मटनाचा आस्वाद घेत नववर्षाच्या स्वागताची अनेकांनी तयारी केली आहे. पण यंदाच्या थर्टी फस्‍टला जरा अडचण आहे. रात्रीची संचारबंदी म्‍हणून हॉटेलवर जाता येणार नाही; आणि मार्गशिर्ष महिन्यातील गुरूवार म्‍हणजे महिलावर्गाचा उपवास. म्‍हणजे नॉनव्हेजचा बेतच नाही. पण काही टेंशन नाही; थर्टी फस्‍ट सेलिब्रेशनसाठी असे नियोजन केल्‍यास उत्‍तम.

जळगाव : थर्टी फस्‍ट म्‍हटले म्‍हणजे संपुर्ण रात्र पार्टी आणि एन्जॉय सुरू असतो. अगदी हॉटेलवर टेबल बुकिंग करून रात्रीचे नियोजन आखले जाते. यंदा मात्र चित्र उलटे आहे. थर्टी फस्‍टच्या एन्जॉयवर यंदा पाणी फिरले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने रात्रीचे लावलेले निर्बंध उत्‍साहासाठी रेड सिग्‍नल आहे.

हॉटेल्‍स्‌ची रोषणाईही विझलेली
थर्टी फस्‍टला हॉटेलमध्ये जावून एन्जॉय करणारे अनेकजण असतात. यामुळे हॉटेल्‍स्‌ देखील फुल्‍ल असतात. याकरीता अगदी आठवडाभरापासून हॉटेल चालकांची तयारी सुरू होते. आकर्षक रोषणाई करून हॉटेल सजविल्‍या जातात. यंदा मात्र तो नुर पाहण्यास मिळत नाही. शहरातील निम्‍मेहून अधिक हॉटेलवरील रोषणाई अजून तरी विझलेलीच पाहण्यास मिळत आहे.

गुरूवार असल्‍याने नॉनव्हेजवर प्रश्‍नचिन्ह
हॉटेलमधील खाणे पसंत नसणारे अनेकजण चिकन आणि मटन विक्रेत्यांना ऑर्डर देत असतात. घरच्याघरी मांसाहरी जेवण तयार करून मित्र आणि कुटुंबीयांसमवेत नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी असते. यामुळे मटन आणि चिकनचा तुटवडा जाणवत असतो. परंतु, यंदा मार्गशिर्ष महिन्याचा गुरूवार असल्याने बहुतांश महिलांचा उपवास राहणार. यामुळे हॉटेल आणि घरी देखील नॉनव्हेज खाणे होणार नाही.

असे करा नियोजन
थर्टी फस्‍ट सेलिब्रेशनला गुरूवार आणि रात्रीची संचारबंदी अडचण असली, तरी पार्टीचे नियोजन आखता येणार नाही. हॉटेलमध्ये जाणे शक्‍य होणार नसल्‍याने घराच्या गच्चीवर परिवारासोबत यंदाची थर्टी फस्‍ट साजरी करण्याचे निमित्‍त यंदा मिळाले आहे. गुरूवारमुळे नॉनव्हेज नसले तरी मस्‍त भरीत पार्टी किंवा गुलाबी थंडीत गरमा गरम भजींचा आस्‍वाद घ्‍यावा. हेही जमत नसेल. तर घरातील किचनला सुटी देवून हॉटेलमधून केवळ पार्सल आणावे आणि घरातील सर्व मंडळींनी एकत्रपणे बसून थर्टी फस्‍टचा आनंद घेणे शक्‍य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news thirty first celebration planning in night curfew