‘त्यांना’ ३८ वर्षांनंतर मिळाली स्वमालकीची जमीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

‘त्यांना’ ३८ वर्षांनंतर मिळाली स्वमालकीची जमीन

पहूर (जळगाव) : ‘हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या काव्यपंक्तीची आठवण व्हावी, असे माणूसपण जपत येथील जाधव परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. (jalgaon-farmer-got-their-own-land-after-38-years)

हेही वाचा: केंद्र सरकार हे इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी : नाना पटोले

येथील आर. टी. लेले विद्यालयाचे निवृत्त लिपिक सुधाकर बोरसे (वय ८४) यांनी मुलीच्या लग्नासाठी १९८४ मध्ये जिवलग मित्र दगडू जाधव यांच्याकडे दहा हजार रुपयांना तीन एकर जमीन गहाण ठेवली. कालांतराने या व्यवहाराचा दोघांनाही विसर पडला. अचानक २०२१ मध्ये कोरोना काळात निवृत्त लिपिक सुधाकर बोरसे यांना जमीन गहाण ठेवल्याची आठवण झाली आणि त्यांनी हा विषय मुलगा डॉ. दिनेश बोरसे यांना सांगितला.

निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत

डॉ. दिनेश बोरसे यांनी या व्यवहाराची माहिती वडिलांचे मित्र (कै.) दगडू जाधव यांच्या मुलाला दिली. सरपंचपती शंकर जाधव यांना या व्यवहाराची माहिती दिली. त्यांनी या विषयासंदर्भात सुधाकर बोरसे यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. या व्यवहाराची श्री. जाधव यांनी सुधाकर बोरसे यांच्याशी चर्चा केली आणि कोणताही स्वार्थ न दाखविता सामाजिक कार्यकर्ते युवराज जाधव यांच्या माध्यमातून सुधाकर बोरसे यांची तीन एकर जमीन त्याच भावात त्यांना परत केली. आजच्या स्वार्थी जगात माणुसकीचा झरा जिवंत ठेवणाऱ्या शंकर जाधव यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.