esakal | शासकिय यंत्रणेची दरवर्षीची पाहणी; तोडगा काढण्यास मात्र असमर्थ
sakal

बोलून बातमी शोधा

ncp mla anil patil

शासकिय यंत्रणेची दरवर्षीची पाहणी; तोडगा काढण्यास मात्र असमर्थ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पातोंडा (ता. अमळनेर) : पातोंडा, मठगव्हाण, रूंधाटी, सावखेडा व मुंगसे शिवारात दरवर्षी पावसाळा (Mansoon rain) सुरू झाला की हजारो हेक्टर शेतीत पाणी (Farmer) साचून पिके नष्ट होतात. पावसाळ्यात दरवर्षी सरकारी ताफे येतात, अहवाल सादर करतात, पंचनामे करतात परंतू आजपावेतो सर्वच अनेक वर्षांपासून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास असमर्थ ठरले आहेत. (jalgaon news water canal problem mla anil patil tour)

शेतकऱ्यांचे दरवर्षी हजारो हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार अनिल पाटील यांनी या समस्येचा कायमस्वरूपी निपटारा होणेकामी पाहणी दौरा केला. महसूल, पाटबंधारे, भुमीअभिलेख व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना व अभियंत्यांना एकाच वेळी पाचारण करून पावसाळ्यात पुराच्या पाण्याने थैमान घालणारा नार्णे, कामतवाडी, सावखेडा, पातोंडा शेतशिवारातून पाहणी दौरा केला. या गावांच्या शेत शिवारातून वाहणारा सुटवा नाला तसेच अंमळगाव व जळोदकडे जाणारे पाट यामधून शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासंदर्भात प्रभावी उपाय योजना करण्याविषयी सुचना दिल्या.

हेही वाचा: पाण्याविना पिके कोमेजली; महावितरण म्‍हणतेय बिले भरा तर रोहित्र

उपाययोजना करा, निधी देतो

सात ते आठ किमी सुटवा नाला हा खोल व रूंद करावा लागेल; तसेच सावखेडा ते जळोद व सावखेडा ते अंमळगाव दोन्ही पाट मोकळे करावे लागतील व सदर समस्या सोडविण्यासाठी कमीत कमी सहा महिने तथा मुबलक प्रमाणात निधीची आवश्यकता भासेल असे मत संबंधित अधिकाऱ्यांनी मांडले. उपाययोजना तुम्ही करा निधीची व्यवस्था मी करेल असे सांगत आमदारांनी अधिकाऱ्यांना आश्वस्त केले. याप्रसंगी तहसिलदार मिलींद वाघ, सार्वजनिक बांधकाम अभियंते सत्यजित गांधलीकर, उपअभियंता दिनेश पाटील, तालूका भुमिलेख अधिकारी सुनिल अमृतकर, शाखाधिकारी गिरणा पाटबंधारे दहिवद, पं.स. सदस्य प्रविण पाटील आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी पाट बुजल्यानेच साचते शेतात पाणी

पाट हा नार्णे कामतवाडी शिवारातून येतो. सावखेडा येथून दोन भागात विभागणी होऊन एक अंमळगावकडे तर दुसरा जळोदकडे जातो. सदर पाटचा समावेश हा आधी गिरणा कॅनलमध्ये होता. परंतु मागील ४० वर्षांपासून सदर पाट बंद असल्याने गिरणा पाटबंधारे विभागाने त्याला आपल्या अधिकार क्षेत्रातून वगळून टाकले आहेत. पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी आधी या पाटांच्या माध्यमातून निघून जात असे परंतू शेतक-यांनीच पाटांची नासधूस करून त्यात शेती करायला सुरूवात केली आहे. पाट सपाट झाल्याने शेतातील पाणी वाहून न जाता शेतातच साचते. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असते.

loading image