esakal | पाण्याविना पिके कोमेजली; महावितरण म्‍हणतेय बिले भरा तर रोहित्र
sakal

बोलून बातमी शोधा

transformer farmer

पाण्याविना पिके कोमेजली; महावितरण म्‍हणतेय बिले भरा तर रोहित्र

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पारोळा (जळगाव) : पळासखेडे बु. (ता. पारोळा) येथील दहा ते पंधरा शेतकऱ्यांचे शेत राजवड शिवारात आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) शेतात कारले, भरीताचे वांगे व भुईमुग पिके लागवड केली आहे. तर काही जणांनी मे महिन्यातील कपाशी लागवडची मशागत (Mahavitaran) पुर्ण केली आहे. मात्र गेल्या वीस दिवसांपासून रोहित्र नादुरुस्त झाल्याने पिके पाण्यावाचून कोमेजू लागले आहेत. (breakdown in the transformer farmer pending bill submit mahavitaran action)

हेही वाचा: खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा केंद्राचा डाव

शेतकऱ्यांनी रोहित्र दुरुस्तीची मागणी केल्यावर अगोदर बिले भरा तरच रोहित्र मिळेल? असे धोरण महावितरणचे असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. रोहित्र दुरुस्तीबाबत कोण शेतकऱ्यांची बाजु मांडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजवड शिवारात रतन शिंदे, विनोद पाटील, आनंदा शिंदे, संतोष लोहार, मधुकर पाटील, राजेंद्र मराठे, सुकदेव शिंदे यांचेसह अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. संबंधित शेतकऱ्यांनी शेतात कारले, भरीत वांगे व भुईमुग पिके आहेत. मात्र गेल्या वीस दिवसांपासून पाण्याअभवी पिके ऊन धरु लागल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.

बिल भरणे झाले अनिवार्य

नवीन नियमानुसार महावितरणचे जाँईट मँनेजिंग डायरेक्टरच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानची चालू बिले संबंधित शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांनी भरली तर नवीन रोहित्र किंवा दुरुस्तीबाबत विचार केला जात असतो. यामुळे बिल भरणे अनिवार्य असल्याचे महावितरणकडुन सांगण्यात आले.

हेही वाचा: धुळ्यात औषध विक्रेत्यांकडून बंदचा इशारा !

शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट

गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मालाला योग्य भाव मिळत नसल्याने जमीन परवडीनाशी झाली आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे बिले भरावी की मान्सुनपुर्व मशागत व शेतात मे महिन्याची लागवड करावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असुन याबाबत लोकप्रतिनिधी यांनी मार्ग काढुन रोहित्र दुरुस्ती किंवा नवीन याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रोहीत्र जळाल्याने विहीर पाणी असुन देखील विजअभावी पिकांना पाणी दिले जात नसल्याने शेतकर्यांपुढे द्विधामनस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे शेतकरी पुर्णपणे भरडला गेला आहे.महावितरण कंपनीने रोहीत्र बसवुन सहकार्य करावे

- राजेंद्र मराठे, शेतकरी, पळासखेडे बु. ता.पारोळा

महावितरणचे नवीन आदेशानुसार शेतकर्यांनी चालु थकबाकी भरावी.संबंधित शेतकर्यांपैकी 80 टक्के शेतकरी यांनी बिले भरल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतरच रोहीत्र बाबत संबंधित अधिकारी विचार करतील.यासाठी शेतकर्यांनी सप्टेंबर ते डिसेंबर महीन्याची करंट बिले भरुन महावितरणला सहकार्य करावे

- निसार तडवी, शाखा अभियंता, मोहाडी कक्ष

loading image
go to top