
लग्न झाल्यापासून आतापर्यंत त्यांना मुलबाळ झाले नाही. या कारणावरून पती राहुल सुर्यवंशी यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली.
जळगाव : शनीपेठ येथील माहेर व भडगाव येथील सासर आलेल्या विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी १० लाख रूपये आणावे आणि मुलबाळ होत नाही म्हणून शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेालिसांत दिलेल्या तक्रारी नुसार ईश्वरी राहुल सुर्यवंशी (वय ३२, रा. भडगाव ह.मु.शनीपेठ जळगाव) यांचे भडगाव येथील राहुल सुर्यभान सुर्यवंशी यांच्याशी २०१३ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्न झाल्यापासून आतापर्यंत त्यांना मुलबाळ झाले नाही. या कारणावरून पती राहुल सुर्यवंशी यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याला सासू सुमनबाई सुर्यवंशी, जेठ महेंद्र सुर्यवंशी, नणंद अनिता अशोक महाजन, नंदोई अशोक बाबुराव महाजन यांनी देखील टोचून बोलणे व शिवीगाळ केली. हा अत्याचार असह्य न झाल्याने विवाहितेने जळगावातील आई-वडीलांना हकीकत सांगितली. पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह इतर चार जणांना शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अमोल कवळे करीत आहे.
सोबतच दहा लाखाचा तगादा
मुलबाळ होत नसल्याने छळ होत असतानाच गेल्या काही महिन्यांपासून प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेरून दहा लाख रूपये आणण्याचा तगादा ईश्वरी सुर्यवंशी यांच्यामागे लावण्यात आला होता. याकरीता देखील छळ होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संपादन ः राजेश सोनवणे