पत्‍नी, मुल घरी नसताना संपविले जीवन; कर्जबाजारपणाचे कारण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

पत्नी, दोन मुले व मुलगी असा त्यांचा परिवार आहे. पत्नी सीमा ही दोन दिवसांपूर्वी मुलासंह माहेरी जळगाव जामोद येथे गेली होती. त्यामुळे धनराज घरी एकटाच

जळगाव ; जळके येथील तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून त्याने कर्जबानजरीपणाला कंटाळून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे माहिती समोर येत आहे. 

जळके (ता.जळगाव) येथील धनराज संतोष जाधव (वय ३६) असे तरूणाचे नाव आहे. धनराज हा मजुरी काम करत होता. पत्नी, दोन मुले व मुलगी असा त्यांचा परिवार आहे. पत्नी सीमा ही दोन दिवसांपूर्वी मुलासंह माहेरी जळगाव जामोद येथे गेली होती. त्यामुळे धनराज घरी एकटाच असताना त्‍याने सोमवारी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. राहत असलेल्या परिसरात गावातच त्यांची आई वडील आणि भाऊ राहतात. 

शेतातून आई- वडील आल्‍यानंतर घटना उघडकीस
आई- वडील सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना धनराजने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास पडले. घटनेची माहिती मिळाल्यावर जळकेकर महाराज यांच्यासह पोलिस पाटील संजय चिमणकर घटनास्थळी गेले. यानंतर धनराजला खाली उतरवून त्‍यास जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र उशीर झाल्‍याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जामुळे धनराज काही दिवसांपासून नैराश्यात असून त्यातूनच त्यांने आत्महत्या केल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news young man suicide home