डंपरची उभ्या रिक्षाला धडक; महिला ठार 

शैलेंद्र बिरारी
Monday, 21 December 2020

नगरदेवळ्याहून प्रवासी घेऊन पॅजो रिक्षा (एमएच ४१, सी ४१०५) ही आखतवाडे येथे जात असताना बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. या वेळी समोरून येणाऱ्या डंपरने (एमएच १९, झेड २१०९) रिक्षाला जोरदार धडक दिली.

नगरदेवळा (जळगाव) : प्रवाशांना घेऊन जाणारी नादुरुस्त पॅजो रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी असताना समोरून येणार डंपरने जोरदार धडक दिला. यात रिक्षातील कासोदा (ता. एरंडोल) येथील कापड विक्रेती महिला जागीच ठार झाली तर दोन महिला जखमी झाल्या. हा अपघात नगरदेवळा - आखतवाडे दरम्यान सोमवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास घडला. 

नगरदेवळ्याहून प्रवासी घेऊन पॅजो रिक्षा (एमएच ४१, सी ४१०५) ही आखतवाडे येथे जात असताना बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. या वेळी समोरून येणाऱ्या डंपरने (एमएच १९, झेड २१०९) रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात शरिफा शेख जाबाज (रा. कासोदा) ही जागीच ठार झाली तर सुनीता रमेश परदेशी, सोनाबाई प्रकाश गढरी या जखमी झाल्या. त्यांच्यावर नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोचार करून पुढील उपचारासाठी पाचोरा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मनोज पाटील, अमोल पाटील तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon pachora auto dumper accident women death