esakal | कोरोना महामारीत महाविद्यालय, विद्यार्थ्यांची प्रशासनाला मदत

बोलून बातमी शोधा

कोरोना महामारीत महाविद्यालय, विद्यार्थ्यांची प्रशासनाला मदत

रासेयोचे स्वयंसेवक  कुटीर रुग्णालयात आपली सेवा देत आहेत. लसीकरणाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी आहेत  त्यात पारोळा शहरात कोणत्याच कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित चालत नाही,

कोरोना महामारीत महाविद्यालय, विद्यार्थ्यांची प्रशासनाला मदत
sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा ः कोरोना जागतिक महामारीने जगातील सर्व देश त्रस्त झाले आहे. कोणताही एक शाश्वत उपाय या महामारीवर अजून  मिळालेला नाही. अशा या निराशेच्या काळात काही देशाने यावर लस शोधून काढली आहे. भारतात सुद्धा कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सींन या लसी नागरिकांना दिल्या जात आहे. महाराष्ट्रात विक्रमी असे लसीकरण झाले आहे. परंतु लसीसोबतच आता वैद्यकीय क्षेत्रात मनुष्यबळसुद्धा कमी पडत आहे. ऑनलाईन नोंदणी, रेकॉर्ड लिहिणे, गर्दी नियंत्रण करणे यासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. अशा या बिकट काळात किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे मदतीला धावून आले आहे.

आवश्य वाचा- साहेब..आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा 
 

पारोळ्याचे तहसीलदार अनिल गवांदे यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन, त्यांच्याच निरीक्षणाखाली किसान राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रशांत इंगोले, डॉ. प्रदीप औजेकर आणि रासेयोचे स्वयंसेवक  कुटीर रुग्णालयात आपली सेवा देत आहेत. लसीकरणाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी आहेत  त्यात पारोळा शहरात कोणत्याच कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित चालत नाही, विजेचा लपंडाव यामुळे लसीकरण करण्यास विलंब होतो. अशावेळी नागरिकांचा रोषसुद्धा पत्करावा लागतो. अशा परिस्थितीत सुद्धा किसान रासेयोचे अधिकारी आणि स्वयंसेवक श्रीमती कल्पना चौधरी, करुणा पवार, डॉ. विद्या पारोचे, विनय कांबळे ,राखी बडगुजर, राजू वानखडे या कुटीर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यासोबत या राष्ट्रीय कामात संयमितपणे सेवा देत आहेत. पारोळा कुटीरमध्ये प्रामुख्याने मयुरी बारी, साक्षी शिनकर, गौरवी विसपुते, भाग्यश्री पाटील, वैष्णवी बडगुजर, काजल चौधरी, यश पाटील, ऋतिक पाटील, सुवर्णा शिंदे, उत्कर्षा सोनार,  हे स्वयंसेवक नियमित सेवा देत आहे. 

मदतीचे कौतुक 

कोरोना महामारीत सामाजिक बांधिलकी जोपावुन राष्टीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व  विद्यार्थी हे जीवाची पर्वा न करता प्रशासनाला मदत करित आहे.ही बाब कौतुकास्पद असल्याचे माजी पालकमंत्री तथा किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले. त्यांचे किसान संस्थेच्या संचालिका रेखाताई पाटील,जि प सदस्य रोहन पाटील,रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार ननावरे, विभागीय समन्वयक प्रा. जे. बी. पाटील, प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी किसान रासेयोच्या कामाचे अभिनंदन करुन  शुभेच्छा दिल्या आहेत.

आवर्जून वाचा- पुन्हा सुरू झाली ऑनलाईन शिक्षणाची चर्चा !

प्रशासनाची हाक व महाविद्यालयाची साथ या भावनेतुन किसान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी हे कुटीर रुग्णालयात सेवाभावी काम करित आहे.त्यांचे मनापासुन अभिनंदन!महामारी नागरिकांनी मनोधैर्य बळकट ठेवुन काळजी घ्यावी.
अनिल गवांदे - तहसिलदार,पारोळा 

 

संपादन- भूषण श्रीखंडे