esakal | ‘कोरोना'मूळे मृत झालेल्या कुटुंबीयांना मिळाला मदतीचा हात !
sakal

बोलून बातमी शोधा

covid help

‘कोरोना'मूळे मृत झालेल्या कुटुंबीयांना मिळाला मदतीचा हात !

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा (corona first waves) दुसऱ्या लाटेतील मृत्यूसंख्या अधिक आहे. राज्यातदेखील मोठ्या प्रमाणावर या काळात मृत्यू ( corona death) झालेत. यात शिक्षकांची (teacher) व वर्ग-४ कर्मचाऱ्यांची देखील संख्या मोठी आहे. यातच फक्त जळगाव जिल्हा, यावल प्रकल्पातील आश्रमशाळांचा विचार केल्यास गेल्या काही दिवसांमध्ये १२ कर्मचारी कोविडमुळे (covid-19) मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना आधार द्यावा, या संवेदनशील हेतूने अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. (corona helps the family ashram school worker organization)

हेही वाचा: खडसेंना धक्का..भाजपचे पण खडसेसमर्थक ६ नगरसेवक सेनेत !


आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपल्या बांधवांचे उद्ध्वस्त झालेले संसार व दुर्दैवाने सोडून गेलेल्या बांधवांच्या परिवारासाठी संघटनने मदतीचा हात दिला आहे. प्रत्येकी ३१ हजार रुपयांची आर्थिक मदत करून या परिवारांच्या मागे संघटना उभी राहिली आहे. संघटनेच्या एका आवाहनावर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या पदरचे पैसे काढून आपले समव्यावसायिक बांधवांसाठी संघटनेवर विश्वास ठेवून निधी देऊ केला.

संघटना करीत असलेल्या कामासाठी यावल प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी देखील निधन झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी भरीव मदत देऊ केली. संघटनेने उभे केलेले सद्‍भावना मयत निधी उपक्रमासाठी प्रकल्प अधिकारी यांनी संघटनेवर टाकलेला हा विश्वास असल्याची भावना संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश पाटील, तसेच जिल्हाध्यक्ष मनोज ठाकरे यांनी व्यक्त करून संघटनेतर्फे प्रत्येकी ५१ हजार रुपये मदत निधी देण्याचा मानस असल्याचे सांगितले. संघटना विविध उपक्रम राबवीत असताना, सद्‍भावना मयत निधीचे वाटप येणाऱ्या आठ दिवसांमध्ये दुर्दैवाने सोडून गेलेल्या जिल्ह्यातील सर्व कर्मचारी बांधवांच्या परिवाराला केले जातील, असे संघटनेच्या सद्‍भावना मयत निधी समितीचे अध्यक्ष वैभव चौधरी यांनी सांगितले. संघटना करीत असलेल्या कामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मयत निधी वितरणकामी संघटनेचे चोपडा तालुका प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष मनोज ठाकरे, चंद्रकांत पाटील, दीपक चौधरी, देवेंद्र चौधरी व नंदलाल झाडिकर, नीलेश पाटील, लक्ष्मीकांत देसले, गजानन पाटील यांची उपस्थिती होती.
(corona helps the family ashram school worker organization)