esakal | खडसेंना धक्का..भाजपचे पण खडसेसमर्थक ६ नगरसेवक सेनेत !
sakal

बोलून बातमी शोधा

corporators joined shiv sena

खडसेंना धक्का..भाजपचे पण खडसेसमर्थक ६ नगरसेवक सेनेत !

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : विधानसभा निवडणुकीत कन्येच्या पराभवानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसेंना (Ncp leader Eknath Khadse) आणखी एक धक्का बसला आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपच्या परंतु खडसे समर्थक असलेल्या १४ पैकी ६ नगरसेवकांनी (Corporator) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. तर आणखी चार सदस्य गुरुवारी (ता.२७) प्रवेश करणार आहेत. (ncp leader eknath khadse supporters corporators joined shiv sena)

हेही वाचा: हॉटस्पॉट ठरलेले स्मार्ट व्हिलेज..झाले कोरोनामुक्त !


मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत १७ पैकी १४ जागा जिंकत भाजपने वर्चस्व प्राप्त केले होते तर नगराध्यक्ष म्हणून नजमा तडवी (Nagar Panchayat Mayor Najma Tadvi) निवडून आल्या होत्या. परंतु, नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने खडसेंना उमेदवारी नाकारली. त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसेंचा (Adv. Rohini Khadse) पराभव होऊन शिवसेनेच परंतु, अपक्ष म्हणून लढलेले चंद्रकांत पाटील आमदार (MLA Chandrakant Patil) झाले.

वर्चस्वाची स्पर्धा

दरम्यानच्या काळात खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत कन्येसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटील व खडसे कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने राजकीय वर्चस्वाची स्पर्धा त्यांच्यात असते. त्यातूनच आता भाजपतून निवडून आलेले परंतु खडसे समर्थक असलेल्या ६ सदस्यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या सहा सदस्यांसह शिवसेनेचे ३ आणि एक स्वीकृत सदस्य असे १० नगरसेवक सध्या मुंबईत आहेत. तर आणखी चार सदस्य गुरुवारी (ता.२७) प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा: आणि 'ती'..म्हणाली, साहेब तुमचं कल्याण होवो !

नगराध्यक्षाही जाणार?
भाजपच्या तिकिटावर लोकनियुक्त म्हणून निवडून आलेल्या नगराध्यक्षा नजमा तडवी यांचाही सेनेत प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. तांत्रिकदृष्ट्या त्यांना प्रवेश करता येणार नाही, मात्र त्या सेनेसोबत असतील, अशी चर्चा आहे.

(ncp leader eknath khadse supporters corporators joined shiv sena)