esakal | मागणी वाढल्याने खाद्यतेलाचे भाव कडाडले 
sakal

बोलून बातमी शोधा

मागणी वाढल्याने खाद्यतेलाचे भाव कडाडले 

महिन्याभरात खाद्यतेलाच्या भावात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने खाद्यतेलाची मागणी वाढलेली आहे. ही मागणी लक्षात घेता साठेबाजांनी डाव साधला आहे. 

मागणी वाढल्याने खाद्यतेलाचे भाव कडाडले 

sakal_logo
By
किशोर पाटील

वावडे (ता. अमळनेर) : साठेबाजी आणि सणासुदीनिमित्त वाढलेल्या मागणीमुळे खाद्यतेलाचे भाव चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेटही कोलमडले असून, खाद्यतेलाच्या दरात महिन्याभरात किलोमागे दहा रुपये वाढ झाली आहे. सामान्य जनतेला कोरोनाशी लढत असताना आता जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा सामना करावा लागत आहे. 


तालुक्यात दररोज १८ लाख लिटरची विक्री केली जात असून, त्यात सोयाबीन तेलाची विक्री सर्वाधिक आहे. नवीन पीक बाजारात येण्यासाठी बराच कालावधी असून, साठेबाजांनी तेलाची खरेदी करून ठेवली आहे. त्यामुळे साठेबाजाच्या हातात तेल बाजार सापडला आहे. परिणामी, गेल्या महिन्याभरात खाद्यतेलाच्या भावात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने खाद्यतेलाची मागणी वाढलेली आहे. ही मागणी लक्षात घेता साठेबाजांनी डाव साधला आहे. 

भावातील फरक (प्रतिकिलो) 
ऑगस्ट २०१९ चे दर (रुपयांत) 
सोयाबीन : ८५ ते ८७ 
शेंगदाणा : १२५ 
सोयाबीन तेल डबा ः १,३५० ते १,३७० 

ऑगस्ट २०२०चे दर 
(रुपयांत) 
सोयाबीन : १०५ 
शेंगदाणा : १४० 
सोयाबीन तेल डबा : १,४७० ते १,५१० 


बाजारात सोयाबीन तेलाचा डबा १,४७० ते १,५१० भावाने विक्री होतो. शहरातील ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ग्राहकांची सोयाबीन तेलाची मागणी असते. परंतु, आता भाववाढ झाल्याने याचा परिणाम विक्रीवर जाणवत आहे. 
-हरीश शहा, 
बालाजी ट्रेडर्स तथा अध्यक्ष, किरकोळ किराणा व्यापारी संघ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top