रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

घेतलेले कर्ज व सावकारी कर्ज फेड न झाल्याने ते मानसिक तणावात असल्‍याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले. डोक्‍यावर कर्जाचा बोजा असल्‍याने ते कंटाळले होते.

अमळनेर (जळगाव)  : दहिवद (ता.अमळनेर) येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळून शहरातील खासगी रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रविण शिवाजी पाटील (वय 47) असे मयताचे नाव आहे.

अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशनमध्ये प्रविण पाटील हे उपचारासाठी दाखल होते. त्यांचा शेती व्यवसाय असल्याने, शेतीत सततची नापिकी तसेच यामुळे घेतलेले कर्ज व सावकारी कर्ज फेड न झाल्याने ते मानसिक तणावात असल्‍याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले. डोक्‍यावर कर्जाचा बोजा असल्‍याने ते कंटाळले होते. त्यातच दुर्धर व्याधी व आजारामूळे खर्च न पेलावत नसल्याने त्यांनी सोमवार (ता. 9) मध्यरात्री दीडच्या सुमारांस रूग्‍णालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना ग्रामिण भागात पसरताच अनेकांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. ते येथील पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष देसले यांचे लहान बंधू होत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner farmer suicide late night in jump hospital building