esakal | जळगावः पातोंडाचे हुतात्मा गणेश सोनवणे अनंतात विलीन
sakal

बोलून बातमी शोधा

Soldier Death

जळगावः पातोंडाचे हुतात्मा गणेश सोनवणे अनंतात विलीन

sakal_logo
By
प्रा. भूषण बिरारी

पातोंडा (ता.अमळनेर): जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) येथे कर्तव्यावर असतांना अपघात (Accident) होऊन हुतात्मा (Soldier) झालेले गणेश सोनवणे यांच्यावर गुरूवारी रात्री भावविवश वातावरणात पत्नी व मुलांनी अग्नीडाग दिला.

हेही वाचा: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ

हुतात्मा गणेश सोनवणेंचे पार्थिव रुग्णवाहिकेने मुंबईहून नायब सुबेदार बी ओ पाटील , हवालदार हर्षल शेलार, शिपाई अशोक कुंभार यांच्या निगराणीत पातोंडा येथे आणले. पत्नी सीमा दोघी मुलींसह नाशिक येथे रहात असून तेथूनच ते गणेश सोनवणे यांच्या पार्थिवा सोबत पातोंडा येथे आले. हुतात्मा गणेश सोनवणे याचे पार्थिवास गावबाहेर आले असता नागरीकांनी हुतात्मा गणेश अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा दिला. यावेळी सर्व परीसर हुतात्मा गणेश सोनवणेंच्या नावांनी दुमदुमला होता.

अहो..आम्ही तुमची वाट पहात आहोत

गणेश सोनवणेचे पार्थिव गावातून जातांना प्रत्येक चौकात रांगोळ्या काढल्या होत्या. गावाच्या बाहेरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात गणेश सोनवणे यांना अग्निडाग पत्नी व मुलीने दिला. यावेळी 'अहो आम्ही तुमची वाट पहात आहोत` तुम्ही मुलींना फिरायला नेणार होते ना, असे म्हणत पत्नीने एकच हंबरडा फोडला.

गाव बंद..

जळगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस युनिटने मानवंदना देऊन सशस्र सलामी दिली. या प्रसंगी प्रांताधिकारी सीमा आहिरे, तहसीलदार मिलींद वाघ हे शासकीय अधिकारी हजर होते. पोलीस उपनिरिक्षक नरसींग वाघ, हवालदार सुनिल पाटील, अरूण बागूल, पोलीस नाईक भुषण बाविस्कर, विनोद धनगर, कैलास पवार , गोकुळ धनगर, पो.काॅ. अमोल पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यास सहकार्य केले. हुतात्मा गणेश सोनवणे यांच्या दुःखद निधनामुळे गावातील सर्व व्यवहार अंशतः बंद ठेवण्यात आले होते.

हेही वाचा: Jalgaon: पाटणादेवीच्या जंगलात गुराख्याचा खून

कुटूंबाचा एकमेव आधार हरपला -

काही वर्षापूर्वी गणेश यांचे दोघे भाऊ व वडील यांचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात गणेश हे आपल्या आई व कुटूंबाचे एकमेव आधार होते. परंतू काळाने अशी अचानक झडप घालून कुटूंबाचा आधार हिरावून नेला.

loading image
go to top