आमदारांनी आश्वासन दिले..आणि शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदारांनी आश्वासन दिले..आणि शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले

आमदारांनी आश्वासन दिले..आणि शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले

कळमसरे (ता.अमळनेर) ः मारवड मंडळासह वंचित शेतकऱ्यांनी (Farmer) सानुग्राह मदत मिळत नसल्याने आमदार अनिल पाटील यांच्या निवास्थानी साखळी उपोषण (strike) करण्याचे इशारा दिला होता. त्यानुसार आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांनी साखळी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेट घेऊन लवकरच शेतकऱ्यांना नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे बुधवारी केले जाणारे उपोषण तुर्त स्थगित करण्यात आले असल्याचे मारवड येथील दिलीप पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: शेतातील सोन्याला चिखलाचे ग्रहण !

सन 2019(जुलै व सप्टेंबर) मध्ये झालेल्या अतिवृष्टित मारवड मंडळासह तालुक्यातील 52 गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता. बाधीत 20 गावांना सानुग्रह प्राप्त झाला.मात्र अजूनही उर्वरित 32 गावे (सप्टेंबरमध्ये बाधीत) वंचित आहेत. याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार मारवड मंडळासह वंचित शेतकरी बांधव आमदार अनिल पाटील यांच्या निवास्थानी १५ सप्टेंबर रोजी घरासमोर साखळी उपोषण करणार होते.

तहसिलदारांना दिले निवेदन

अमळनेर येथे तहसीलदार मिलिंद वाघ यांना उपोषण स्थगित बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मारवड येथील शेतकरी दिलीप पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

हेही वाचा: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रंगला‘डीन’च्या खुर्चीचा किस्सा..

तर उपोषण करू..

अतिवृष्टीत नुकसान झालेले शेतकरी निवास्थानासमोर उपोषण करणार असल्याचे समजताच आमदारांनी शेतकऱ्यांची भेट घेत आश्वासन दिले आहे. मात्र यात दिरंगाई झाल्यास वंचित गावातील शेतकरी नक्कीच उपोषण करतील असेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले .

Web Title: Marathi News Amalner Mla Anil Patil Assured The Strike Farmers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..