esakal | पुण्याच्या चार सराईत गुन्हेगारांना पिस्तूल, काडतुसांसह अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुण्याच्या चार सराईत गुन्हेगारांना पिस्तूल, काडतुसांसह अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमळनेर : बकरी ईदनिमित्त (Bacri eid)अमळनेर शहरात स्टेशन रोड ते सुभाष चौक रस्त्यावर नाकाबंदीदरम्यान (Roadblocks) वाहनांची तपासणी करीत असताना पोलिसांनी (Police) पुण्यातील चार सराईत गुन्हेगारांना (Pune Criminals) गावठी पिस्तूल व काडतुसांसह ताब्यात घेतले.

(amalner police pune four nabbed criminals arrest)

हेही वाचा: अवैध्य चालत्या फिरत्या बायोडिझेल पंपावर पोलिसांची कारवाई

शहरातील स्टेट बँकेजवळ पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पोलिस कर्मचारी सुनील हटकर, भटूसिंग तोमर, राजेंद्र कोठावदे, दीपक माळी, रवींद्र पाटील, विलास बागूल यांचे पथक नाकाबंदीत वाहनांची तपासणी करीत होते. यादरम्यान रात्री नऊच्या सुमारास स्विफ्ट कार (एमएच १२, टीडी ६७९१) थांबविली असता तिच्यात बसलेल्या चार व्यक्तींचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांची चौकशी करून झडती घेतली असता पंकज ऊर्फ बंटी शंकर भुमकर (वय २५, रा. नरे अंबेगाव, ता.जि. पुणे) यांच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅग्झिन, तीन जिवंत काडतुसे आढळून आली. त्यांची चौकशी केली असता मनोज ऊर्फ मयूर भाऊसाहेब गायकवाड (२५, रा. चिखली जाधववाडी, ता. हवेली, जि. पुणे), आकार प्रकाश नाळे (२८, रा. द्वारका विश्व, भोसरी, पुणे), प्रशांत शिवाजी गुरव (३०, भोसरी, पुणे) यांच्यासह उमर्टी (मध्य प्रदेश) येथे जाऊन तेथून हे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस मॅग्झिन असे विकत घेतले असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतूस, मॅग्झिनसह कार, मोबाईल असा दहा लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: अंगावरची हळद फिटत नाही तोच..नवविवाहितेने उचले कठोर पाऊल

प्राथमिक तपासात चारपैकी तीन संशयितांवर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे समजले. या प्रकरणी रवींद्र पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी सुनील हटकर तपास करीत आहेत. चारही संशयितांना अटक करून न्यायालयाने २३ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

loading image