esakal | अंगावरची हळद फिटत नाही तोच..नवविवाहितेने उचले कठोर पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

अंगावरची हळद फिटत नाही तोच..नवविवाहितेने उचले कठोर पाऊल

अंगावरची हळद फिटत नाही तोच..नवविवाहितेने उचले कठोर पाऊल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव ः लग्नाची हळद फिटत नाही अन्‌ हातावरील मेंदीचा रंग उतरत नाही, तोवर लग्नाच्या अकराव्या दिवशीच नवविवाहितेने (Newlyweds)पतीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Jalgaon Suicide)केली. करिना सागर निकम (वय १९) असे मृत विवाहितेचे नाव आहे.तान्हुली असतानाच सोडून गेलेल्या आईने सासरचा जाच आणि बळजबरी लग्न (Marriage) केल्याचा आरोप माध्यमांसमोर केला. नात करिनाच्या मृत्यूचे (Death) कुठलेही ज्ञात कारण नसताना तिने गळफास घेतल्याने संगोपन करणारी आजीबाई मात्र या घटनेमुळे सुन्न झाली होती.

(jalgaon newlyweds woman suicide by strangulation)

हेही वाचा: जळगाव, चाळीसगाव वगळता जिल्ह्यात नवे कोरोना बाधित शून्य

दांडेकरनगरातील करिनाचे ११ जुलैस सागर राजू निकम या तरुणाशी थाटामाटात लग्न झाले होते. सासू निर्मलाबाई राजू निकम जळगाव शहरातील माजी नगरसेविका आहेत. घरात बऱ्यापैकी आनंदी वातावरण असून, लग्नाच्या आठवणी अजूनही ताज्याच आहेत. सकाळी पती सागर निकम दूध फेडरेशनमध्ये कामावर निघून गेले. सासरे गाडीवर गेले. घरात सासू व दीर असताना तिच्या खोलीत करिनाने सकाळी साडेदहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

आवाज झाल्याने धावपळ
खोलीत काहीतरी आपटण्याचा आवाज झाला. कानोसा घेतला असता, आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने शेजारच्यांसह सासू, दीर आणि इतरांनी आत धाव घेतली. करिनाने गळफास घेतल्याचे पाहिल्यावर तत्काळ तिला खाली उतरवून कुटुंबीयांनी जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी करिनाला मृत घोषित करताच कुटुंबीयांनी आक्रोश केला.

हेही वाचा: पोलिसांची सर्तकता..आणि पुलावरच सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला


आईचा आक्रोश अन्‌ आरेाप
करिना लहान असताना आईने लग्न करून स्वतःचा दुसरा संसार थाटला. मुलीला लहानाची मोठी करून संगोपन करत वयोवृद्ध आजीने नुकतेच सागरशी लग्न लावून दिले. त्यामुळे आई सुलोचनाने अगोदर तिच्या सासरच्यांवर आक्षेप घेत आरेाप केले. नंतर ती अल्पवयीन असताना बळजबरीने लग्न लावून दिल्याची बडबड करत आक्रोश केला.㈶

loading image