esakal | कोरोना असो की आणखी काही; जावई पुजनाचे पुण्य घेणारच
sakal

बोलून बातमी शोधा

adhik month

अधिक मासात या वस्तूंची दान व जावयांच्या कौतुकासाठी विशेष खरेदी केली जाते. दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास धार्मिकदृष्ट्या विशेष महिना मानला जातो. यात जावयांना चांदीच्या वस्तू देण्याची परंपरा असते. त्यासोबत विविध धार्मिक दानासाठी देखील वस्तू खरेदी केल्या जातात.

कोरोना असो की आणखी काही; जावई पुजनाचे पुण्य घेणारच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वावडे (ता. अमळनेर) : यंदा १९ वर्षांनंतर अश्विन अधिक मास येत आहे. अधिक मास हा पुरुषोत्तम मास किंवा ‘धोंडा महिना’ म्हणूनही ओळखला जातो. अधिक मासानिमित्त जावयाला चांदीच्या ताटासह काही वस्तू दान देण्याची प्रथा आहे. शुक्रवारपासून (ता. १८) अधिक मास सुरू झाला आहे. अधिक मासानिमित्त चांदीच्या बाजारपेठेत फॅन्सी दिवे, लामण दिवा, निरंजन, नंदादीप यांसह अनेक प्रकारच्‍या चांदीच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. 

अधिक मासात या वस्तूंची दान व जावयांच्या कौतुकासाठी विशेष खरेदी केली जाते. दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास धार्मिकदृष्ट्या विशेष महिना मानला जातो. यात जावयांना चांदीच्या वस्तू देण्याची परंपरा असते. त्यासोबत विविध धार्मिक दानासाठी देखील वस्तू खरेदी केल्या जातात. याशिवाय मंदिरामध्ये चांदीच्या वस्तू दान मोठ्या प्रमाणात दिले जाते. 
अधिकस्य अधिक फलम या सुभाशितानुसार अधिक मासात केलेले दान अधिक शुभ मानले जाते. या महिन्यात महिला त्यांची चांदीची जोडवी नवी करून घेणे किंवा जुन्या जोडव्यातील चांदी वाढवून घेतात. त्यामुळे नवीन जोडवी किंवा चांदी वाढवण्याची कामे अधिक प्रमाणात होता. तसेच पायाच्या तिसऱ्या बोटांमध्ये घातली जाणारी विच्छवे व पायातील पैंजण देखील खरेदी केली जातात. दीप दानाला अधिक मासात मोठे महत्त्व आहे. चांदीच्या दिव्यांचे अनेक प्रकार अधिक मासानिमित्त खरेदी केली जातात. यामध्ये चांदीचे निरंजन, नाशिक घाटाची समई, फॅन्सी नक्षीची समय, नंदादीप, लामणदिवा असे प्रकार असतात. फॅन्सी प्रकारात देवदास किंवा हा एक प्रकार उपलब्ध झाला आहे. मराठवाडी परंपरेत चांदीचे धोंडे जावयांना दिले जातात. तशा प्रकारचे धोंडे विक्री होतात. यासोबत बेलाची पाने, ताट, फळांची बाउल, विविध देवतांच्या चांदीच्या मूर्ती आदी वस्तूंची खरेदी केली जाते. 

अधिक मासात चांदीच्या वस्तूंची खरेदी अधिक प्रमाणात होत असते. जोडवी नवी करण्यापासून ते दानासाठी लागणाऱ्या चांदीच्या वस्तू दिल्या जातात. या महिन्याचे पावित्र्य विशेष असल्याने खरेदीचे प्रमाण वाढते. 
- आशिष अलंकार, सराफा व्यावसायिक, अमळनेर 
 
गुरुपुष्पामृत हे सोने खरेदीसाठी, तसेच अधिक मास चांदी खरेदीसाठी महत्त्वाचा असतो. महिला जोडवीमध्ये चांदी वाढवून घेण्याचे काम याच महिन्यात करण्याची मोठी परंपरा आहे. याशिवाय चांदीचे ताट, वाटी, तांब्या, पेले, दिवे अशा वस्तूंना महत्त्व दिले जाते. 
- प्रमोद भामरे, सराफ व्यावसायिक, अमळनेर