जेष्ठ नॅनो शास्त्रज्ञानी घेतला... विज्ञान-गणित शिक्षकांचा ऑनलाइन वर्ग 

जेष्ठ नॅनो शास्त्रज्ञानी घेतला... विज्ञान-गणित शिक्षकांचा ऑनलाइन वर्ग 

अमळनेर : सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन च्या माध्यमातून अध्यापन केले जात आहे. हाच धागा पकडत विज्ञान व गणित विषयाच्या शिक्षकांना ऑनलाइन मार्गदर्शन मिळाल्यास ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदवतात या पार्श्वभूमीवर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, अमळनेर तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नॅनो तंत्रज्ञान व समाज या विषयावर नॅनो शास्त्रज्ञानी विज्ञान व गणित शिक्षकांचा ऑनलाइन वर्ग घेतला.

काळानुसार अनेक बदल होत असतात. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जळगाव, भुसावळ व अमळनेर ला झिरो लॉक डाऊन सुरू आहे. प्रत्यक्षात शिक्षकांना एकत्र आणणे शक्य नसले तरी ऑनलाइन च्या माध्यमातून एकत्र येत अमळनेर येथील जेष्ठ नॅनो शास्त्रज्ञ तथा प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ एल ए पाटील यांनी विज्ञान व गणित शिक्षकांचा ऑनलाइन वर्ग घेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण विश्वातील आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे याला कारणीभूत म्हणजे कोरोनाविषाणू या परिस्थितीवर मात करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानच उपयोगी पडणार असून लवकरच या वरील लस येणार असून संपूर्ण जगाला दिलासा मिळेल नॅनो तंत्रज्ञानामुळे भविष्यातील मानवी जीवनामध्ये अमुलाग्र बदल होणार आहे. नॅनो पार्टिकल मुळे पदार्थाच्या गुणधर्मात आकारात रंगात बदलत होत असतो हे बदल विविध मानवी उपयोगी गोष्टींसाठी उपयुक्त आहे यात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये संगणक क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होऊन भलामोठा कॉम्प्युटर आता आपल्या हातात येऊन बसला वैद्यकीय क्षेत्रांमध्ये विविध आजारांचे निदान करून योग्य उपचार करण्यासाठी होणार आहे भविष्यात पाण्यावर चालणाऱ्या गाड्या देखील निर्माण होतील तसेच नैनो रोबोट आपल्या शरीरात सोडला असता आपल्या शरीरातील विविध व्याधींची माहिती आपल्याला तात्काळ देणार आहे त्याचप्रमाणे पृथ्वीतलावर होणारे जल वायू प्रदूषणाला आळा घालता येणे शक्‍य होणार आहे तसेेच नॅनो तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून याठिकाणी संधी देखील उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

नॅशनल कौन्सिल सायन्स टीचर संस्थेचे संचालक संदीप पाटील यांनी देश पातळीवरील विविध वैज्ञानिक उपक्रम महाराष्ट्राच्या विविध भागात पोहचवायचे आहेत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा आहे यासाठी विज्ञानाचे विविध प्रयोग विद्यार्थ्यांना सहजगत्या करता आले पाहिजे यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन व प्रशिक्षित करण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सांगितले

विज्ञान अध्यापक मंडळाचे किशोर राजे म्हणाले की नॅनो टेक्नॉलॉजी हा शब्द सर्वांनीच ऐकला आहे परंतु यावर ची सविस्तर माहिती आजच्या व्याख्यानातून मिळाले असून भविष्यातील मानवा वरती होणारे चांगले परिणाम याबाबतची माहिती आजच्या व्याख्यानातून देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी आता या नॅनो तंत्रज्ञानाकडे केंद्रित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सदर वेबिनार साठी बी. बी. जोगी, बी. आर. महाजन,नवनीत सपकाळे, रवींद्र चौधरी, विजय मोरे,रियाझ शेख, अल्पा कोटेचा,राजकोट हुन डॉ.चंद्रमौली जोशी यांच्यासह जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक ,शिक्षक मोठ्या संख्येने झूम अँप वर ,फेसबुक लाईव्ह वर आदी उपस्थित होते.ज्यांना हा कार्यक्रम लाईव्ह बघता आला नसेल त्यांनी जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या फेसबुक पेज बघू शकता. प्रास्ताविक संजय पाटील यांनी तर सुत्रसंचलन निरंजन पेंढारे यांनी तर आभार प्रमिला अडकमोल यांनी मानले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com