
पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे दिलेल्या निवेदनातून करून देण्यात आली आहे. यावेळी खडसे यांच्याशी ही समितीतर्फे धरणाच्या कामाला गती देणेबाबत चर्चा करण्यात आली.
अमळनेर (जळगाव) : गुजराथला वाहून जाणारे पाणी अडवून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद पेरा या आशयाचे निवेदन देत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे आज साकडे घालण्यात आले. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचीही भेट घेऊन धरण प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली.
जनआंदोलन समितीचे पदाधिकारी सुभाष चौधरी, सुनिल पाटिल, एस. एन. पाटील, प्रशांत भदाणे, रविंद्र पाटील, रणजित शिंदे, देविदास देसले, ऍड कुंदन साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते. खानदेशातील सर्वाधिक जलसाठवण क्षमता असलेला पाडळसरे धरण प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण करा, मागच्या भाजप शासनाने खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली होती. प्रकल्पाची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे याची जाणिव पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे दिलेल्या निवेदनातून करून देण्यात आली आहे. यावेळी खडसे यांच्याशी ही समितीतर्फे धरणाच्या कामाला गती देणेबाबत चर्चा करण्यात आली.
समितीसोबत बैठक
वर्णेश्वर महादेव मंदिर येथे धरण लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी आमदार लता सोनवणे यांच्यासोबत झालेल्या समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. शासन दरबारी धरणाच्या कामास गती देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी समितीला संबोधित करतांना आमदार सोनवणे यांनी प्रत्येक मुंबई भेटीत पाडळसरे धरणाबाबतच्या कामास शासनाने प्राधान्य द्यावे; यासाठी सहकारी लोकप्रतिनिधिंना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. पाडळसरे धरण समितीच्यावतीने धरणाचे काम गतिमानतेने सुरू व्हावे म्हणून सातत्याने आंदोलन, संघर्ष, पाठपुरावा सुरू आहे.