अहमदाबाद- हावडा एक्सप्रेसवर चक्क..ट्रक आदळला 

अहमदाबाद- हावडा एक्सप्रेसवर चक्क..ट्रक आदळला 
Updated on

अमळनेर ः अमळनेर ते धरगाव दरम्यान भोणे गावाजवळ रेल्वे ट्रॅकचे काम सुरू आहे. खडीने भरलेला डंपर ट्रॅकच्या बाजूला होता. कामगारांच्या बेफिकीरीमुळे अहमदाबाद- हावडा एक्स्प्रेस जळगावकडे जात असताना भरलेला ट्रक घसरून रेल्वे वर जाऊन धडकला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी आणि वित्त हानी झाली नाही. मात्र, काही वेळ हावडा एक्सप्रेस खोळंबली.

भोणे गावाजवळ रेल्वे ट्रकचे काम सुरू असून ट्रकच्या जवळ खडीने भरलेला हा ट्रक उभा होता. सकाळी हावडा एक्सप्रेस जात असतांना हा ट्रक घसरून थेट रेल्वेर आदळला. एक्सप्रेस लगेच थांबल्याने मोठा अपघात टाळला. अचानक झालेल्या या घटनेने प्रवासी भयभीत झाले होते. अनेक प्रवासी खाली उतरून काय झाले ते पाहत होते. परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाची रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची गरज आहे.

रेल्वे लाईन सुरळीत

संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. ट्रक बाजूला झाल्यानंतर रेल्वे पुढे रवाना झाल्याने प्रवाशांनी निश्वास सोडला.

जेसीबीच्या मदतीने ट्रक केला बाजूला

अपघानंतर जेसीबीने डंपर खाली करून ट्रक मागे सरकवण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. ठेकेदार अथवा कामगारांच्या बेफिकीरीने हा प्रकार घडला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com