केंद्र मका खरेदीला तयार; राज्याकडूनच प्रस्ताव नाही 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

केंद्र शासनाने गेल्या आठवड्यात २५ हजार टन खरेदीला मान्यता दिली. मात्र, अवघ्या पाच ते सहा दिवसांतच ही खरेदी पूर्ण झाल्याने राज्यात मका खरेदी बंद झाली. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी मका खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत.

भडगाव : राज्य शासनाला शेतकऱ्याची खरच चिंता वाटत असेल तर त्यांनी मका खरेदीची केंद्र शासनाकडे परवानगी मागावी. केंद्र शासन मका खरेदीला परवानगी द्यायला तयार आहे; पण राज्य शासनाने अद्यापपर्यंत तशी मागणी केलेली नाही, असे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी मका खरेदीचा चेंडू राज्य शासनाकडे टोलावला आहे. परिणामी, आता राज्य शासन मका खरेदीची मागणी केंद्राकडे का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
केंद्र शासनाने गेल्या आठवड्यात २५ हजार टन खरेदीला मान्यता दिली. मात्र, अवघ्या पाच ते सहा दिवसांतच ही खरेदी पूर्ण झाल्याने राज्यात मका खरेदी बंद झाली. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी मका खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर खरेदी केंद्रावर उभे आहेत. जिल्ह्यात तब्बल १६ हजार, तर राज्यात ४५ हजारांच्या जवळपास शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, भरडधान्य १५ ऑगस्टपर्यंतच खरेदी करणे शक्य आहे, असे स्पष्ट करून मंत्री दानवे म्हणाले, की राज्य शासनाने तत्काळ मागणीचा प्रस्ताव देणे आवश्यक आहे. अर्थात खरेदीसाठी केंद्र शासन पैसे देते. राज्य शासनाने फक्त बारदान उपलब्ध करून द्यायचे असते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon corn kharedi central government parmission