शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी..रब्बीसाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन 

सुधाकर पाटील
Friday, 27 November 2020

आज कालवा सल्लागार समिती ची बैठक झाली. त्यात गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तिन आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. 5 डीसेबंरला पहीले आवर्तन धरणातून सोडण्याच्या सुचना दिल्या आहेत. 
- गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव 

भडगाव (जळगाव) : रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. शुक्रवारी (ता. २७) अजिंठा विश्रामगृहात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यामुळे रब्बीचे लांबलेले आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. ५ डिसेंबरला रब्बीसाठी पहीले आवर्तन सोडण्यात येणार आहे. 

तिन आवर्तन सुटणार 
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार चिमणराव पाटील, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आनंद मोर, गिरणा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एम. एस. आमले, कार्यकारी अभियंता धर्मेद्रकुमार बेहरे, सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत पवार उपस्थित होते. या बैठकीत रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. पहिले आवर्तन पाच डिसेंबरला सोडण्यात येणार आहे. एप्रिल व जूनमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तन सोडण्यात येतील. 

रब्बी हंगाम बहरणार 
गिरणा धरण सलग दुसर्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रब्बी हंगाम बहरणार आहे.  गिरणा धरणात सध्या 18 हजार 500 दशलक्ष घनफूट  एवढा उपयुक्त जलसाठा आहे. रब्बीसाठी एका आवर्तनला साधारण 2 हजार 600 दशलक्ष घनफूट एवढे पाणी लागते. त्यामुळे तिन आवर्तननांना साधारण साडेसात हजार दशलक्ष घनफूट पाणी लागेल तर त्यानंतर एप्रिल व मे कींवा जुन महिन्यात  पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तन सुटु शकतात. गिरणा धरणावर एकूण 69 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील 57 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. पण पाटचार्याची दुरावस्था पाहता साधाणत: 25 हजार हेक्टर पर्यंत पाणी पोहचते. 
 
पुर्व हंगामासाठी एक आवर्तन हवे 
यंदा खरीप हंगाम चांगला बहरला होता..मात्र परतीच्या पावसाने खरीपाचे मोठ्याप्रणात नुकसान झाले. तर कापसावरही बोंडअडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात पन्नास टक्के घट झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे पुर्व हंगाम कापुस लागवडीसाठि गिरणा धरणातुन मे महीन्यात कीमान एक आवर्तन मिळायला हवे अशी अपेक्षा शेतकर्याकडुन व्यक्त होत आहे. गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर 'हसू' आहे. मात्र शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी मे महिन्यात पुर्व हंगामी कापुस लागवडीसाठी एक आवर्तन देण्यात यावे अशी मागणी गिरणा पटट्यातुन करण्यात येत आहे. रब्बीच्या तिन आवर्तनना साडेसात हजार दशलक्ष घनफूट व नंतर पिण्यासाठीचे दोन आवर्तन धरून ही आठ हजारांच्या जवळपा पाणी धरणात शिल्लक राहू शकते. त्यामुळे त्याअंगाने विचार करून पुर्व हंगामासाठी एक आवर्तन मिळणे आवश्यक आहे. 
 

गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवाना रब्बी हंगामासाठी पाणी हवे असल्यास तत्काळ त्या त्या शाखांकडे फार्म भरून पाण्याची मागणी नोंदवावी तर पाणी पट्टी भरण्याबाबत ही शेतकर्यानी सहकार्य करावे. 
- धर्मेद्रकुमार बेहरे, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे जळगाव 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon farmer good news girna dam three time water flow