गिरणा पट्ट्यात रब्‍बी बहरणार; चार आवर्तने मिळणार

girna river
girna river

भडगाव (जळगाव) : गिरणा धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रब्बी हंगामासाठी चार आवर्तने मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी रब्बी हंगाम यंदा फुलणार आहे. गिरणा धरणावर जिल्ह्यातील तब्बल ५९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. 

गिरणा धरणात सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के जलसाठा झाला आहे.  त्यामुळे गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांमधे आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. या पाणीसाठ्यातुन रब्बी हंगामासाठी चार आवर्तन मिळू शकणार आहेत. अतिवृष्टीमुळे खरीपाला बसलेला फटका रब्बीतुन वसूल करण्याचे स्वप्न गिरणा पट्ट्यातील शेतकरी पाहत आहे. 

'रब्बी'फुलणार
गिरणा धरणाची एकुण क्षमता ही २१ हजार ५०० दशलक्ष घनफुट एवढी आहे. सद्य:स्थितीला धरणात १०० टक्के जलसाठा आहे. त्यापैकी १८ हजार ५०० दशलक्ष घनफुट एवढा उपयुक्त जलसाठा आहे. पुर्वनुभव पाहता धरणातुन यंदा कीमान एवढ्या पाणीसाठ्यात रब्बी हंगामाला चार आवर्तन मिळायला हरकत नाही. त्यामुळे गिरणा पट्ट्यात रब्बी हंगामात शिवार हीरवाईने बहरलेला दिसणार आहे. अद्याप कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसल्याने रब्बीसाठी पाण्याचे नियोजन झालेले नाही. गेल्यावर्षी रब्बीसाठी ३ आवर्तन देण्यात आले होते. 

पाणीटंचाई ही मिटली 
गिरणा धरणात १०० टक्के पाणीसाठा झाल्याने गिरणा पट्ट्यातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघाला आहे. धरणावर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, पालिकासह १५८ ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यामुळे या गावांची पाणीटंचाई दुर झाली आहे. गेल्यावर्षी धरणात १०० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्यावर्षीही पाणीटंचाई ची झळ गिरणा पट्ट्यात फारशी बसली नव्हती. यंदा धरण पुर्ण भरल्याने पाणीप्रश्न सुटला आहे. त्यामुळे लोकांमधे आनंदाचे वातावरण आहे. 

'हसू' अन् 'आसू'
यंदा वेळेवर आणि पिकांना आवश्यकतेनुसार पाऊस बरसल्याने खरीप हंगाम कधी नव्हे एवढा चांगला बहरला होता. मात्र या बहरलेल्या हंगामाला अतिवृष्टीची नजर लागल्याने खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ४०-५० टक्के पर्यंत नुकसान झाल्याचे चित्र आहे. कापसाचे बोंड सडून गेले तर ज्वारी डिस्को व्हायला लागली आहे. केळीचे ही सिएमव्ही या रोगाने मोठे नुकसान झाले. त्यात गिरणा धरण पुन्हा १०० टक्के भरल्याने रब्बी हंगाम बहरणार असल्याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर 'हसू' आणि 'आसू' पहायला मिळत आहे. 
 
अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही निघणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी गिरणा धरणाच्या पाण्याचे व्यवस्थीत नियोजन करून चार आवर्तन देण्याबाबत सुचना देऊ.
- किशोर पाटील, आमदार पाचोरा-भडगाव 


कालवा.........अवलंबून......,लांबी
(हेक्टरमधे)      ( की.मी.मधे)        
पांझण डावा.......12141........54.20
जामदा डावा.......19658.........56.36
जामदा उजवा........3663.......32.18
गिरणा निम्न........34888........45.5


गिरणा धरणावर अंवलबून असलेले क्षेत्र  (हेक्टरमधे) 

तालुका.........अवलंबून क्षेत्र 

चाळीसगाव.......963
भडगाव.............10563
एरंडोल...............10354
धरणगाव.............22187
अमळनेर..............10258
पारोळा................2884
मालेगाव..............1000
धुळे.....................1700

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com