ग्रामपंचायस्‍तरावर आता कृषी विकास समिती; काय करणार काम जाणून घ्‍या

सुधाकर पाटील
Friday, 11 September 2020

शेतीच्या सार्वागीन विकासासाठी गावांमधील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनीयोग करणे, विविध योजना, प्रकल्प यामधून हात घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४९ (४) नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमधे ग्राम कृषीविकास समीती ची स्थापना करण्यात येणार आहे.

भडगाव : शेतकऱ्यांना आता गावातच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहीती मिळणार आहे. कारण ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे प्रत्येकापर्यंत कृषी विभागाच्या योजना पोहचविणे सोपे होणार आहे. तर गावातील जे ठराविक व्यक्तीच पुन्हा पुन्हा योजनेचे लाभ घेत होते; त्यांना ही आपोआप चाप बसणार आहे. शेतकऱ्यांकडुन या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या समित्या फक्त कागदारवच न राहता शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहाव्यात अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडुन व्यक्त करण्यात येत आहे. या बारा सदस्यीय समीतीत लोकप्रतीनीधी, कर्मचारी, प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. 

शेतीच्या सार्वागीन विकासासाठी गावांमधील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनीयोग करणे, विविध योजना, प्रकल्प यामधून हात घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४९ (४) नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमधे ग्राम कृषीविकास समीती ची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे गावाच्या चावळीवरच बसून शेतीच्या गप्पा रंगणार आहेत. या समितीमुळे शेतकऱ्यांना आता गावातच कृषी विभागाच्या विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे. 

सरपंच असतिल पदसिध्द अध्यक्ष 
ग्राम कृषी विकास समीतीत एकूण १२ सदस्य असणार आहेत. गावाचे सरपंच हे या समीतीचे पदसिध्द अध्यक्ष असणार आहे. उपसरपंच हे पदसिध्द सदस्य असतील. तर ग्रामसेवक हे सचिव व कृषी सहाय्यक सह सचिव असणार आहेत. याशिवाय एक ग्रामपंचायत सदस्य, तीन प्रगतशील शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी वा शेतकरी गटाचा एक सदस्य, महीला बचत गटांचा एक सदस्य, कृषी पुरक व्यवसायीक शेतकरी, तलाठी यांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे ग्राम कृषी विकास समतीत अर्धे सदस्य हे महीला असतील. या समीतीची मुदत ही ग्रामपंचायतीच्या मदतीइतकीच राहणार आहे. नविन ग्रामपंचायत झाल्यानंतर ४५ दिवसाच्या ग्राम कृषीविकास समिती गठीत करणे बंधनकारक आहे. पदसिध्द सदस्य व्यतीरिक्त सदस्याची निवड ही ग्रामसेभेच्या मान्यते करावी लागणार आहे. 

समीती करणार जनजागृती 
ग्राम कृषी विकास समीती शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या समितीची दर महिन्याला एकदा बैठक घेणे आवश्यक आहे. ग्रामसेवक व कृषी सहाय्यकाने समन्वयाने बैठकीचे आयोजन करावयाचे आहे. शासनाच्या कृषी विषयक योजना ग्रामपंचायत क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्याबरोबर प्रचार व प्रसार करणे, योजनांचा नियमीत आढावा घेऊन योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याशिवाय स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलध्दता, जमीतनीची पोत आदि बाबी लक्षात घेऊन विविध पिक लागवडी संबधि नियोजन करून त्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन समतीला करावे लागणार आहे. कार्यक्षेत्रतील जलसंधारणाची मर्यादा लक्षात घेऊन कमी पर्जन्यमान असलेल्या ठीकाणी दर्जेदार पिक कसे घेता याबाबत समीती एकत्रित काम करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा, एकात्मिक कीड नियंत्रण, पोषण व्यवस्थापन, संरक्षित फळबाग लागवड या विषयावर शेतकर्याना मार्गदर्शन करणार आहे. शेती पुरक व्यवसायाना चालना देण्यासाठी तज्ञाना बोलावून शेतकर्याना मार्गदर्शन करण्याचे काम समीतीने करावयाचे आहे. 

...तरच होतील दैनंदिनी मंजूर 
ग्राम कृषी विकास समित्या कार्यान्वित झाल्यानंतर पंचायत समतीचे कृषी विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी (पंचायत समीती), कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी अधिनिस्त कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकार्यानी प्रत्येक महिन्याला कीमान तिन ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या सर्व अधिकार्याना दैनंदिनी मंजुरीसाठी बैठकांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon gram panchayat lavel agree culture comity