मजूरांसाठी चक्‍क मध्यस्‍थीच्या पत्‍नीचे अपहरण

सुधाकर पाटील
Thursday, 15 October 2020

ऊसतोड मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सुमारे तीन वर्षापुर्वी मानसिग चव्हाण (रा. जेवळी, ता.तुळजापुर) यांच्या मध्यस्थीने जेवळी (ता. तुळजापुर) येथील लेबर ठेकेदार बाळु राठोड, रमेश राठोड यांनी वडगाव नालबंदी येथीलच विठ्ठल हरी राठोड यांच्याशी ऊसतोड मजुर पुरविणे करीता व्यवहार केला होता.

भडगाव (जळगाव) : वडगाव- नालबंदी (ता. भडगाव) येथे मोठी रक्कम घेऊन ऊसतोड कामगार पुरविले नाही. या वादात मध्यस्थीच्या पत्नीचे अपहरण करण्यात आले. अपहरण केलेल्या महिलेला भडगाव येथे पोहच करत अपहरण करणारे पसार झाले आहेत. याबाबत पोस्टेला महिला अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचे अपहरण करणारे हे वडगाव- नालबंदी येथीलच असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

वडगाव- नालबंदी येथील मानसिंग पोपट चव्हाण हे आपल्या पत्नी सुनंदा चव्हाण मुली आनंदी, रुख्मिणी, संपदासह राहतात. ऊसतोड मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सुमारे तीन वर्षापुर्वी मानसिग चव्हाण (रा. जेवळी, ता.तुळजापुर) यांच्या मध्यस्थीने जेवळी (ता. तुळजापुर) येथील लेबर ठेकेदार बाळु राठोड, रमेश राठोड यांनी वडगाव नालबंदी येथीलच विठ्ठल हरी राठोड यांच्याशी ऊसतोड मजुर पुरविणे करीता व्यवहार केला होता. 

१ लाख ९० हजार घेतले
मजुर पुरविण्याच्या व्यवहारात बाळु राठोडने १ लाख १० हजार व रमेश राठोड यांनी ८० हजार रुपये विठ्ठल हरी राठोड यांस दिले होते. १ लाख ९० हजार रुपये घेऊन देखील विठ्ठल राठोड यांनी ऊसतोड कामगार पुरविले नाही. तर ऊसतोड कामगार पुरविणे सतत टाळाटाळ करत होता. या पैशांच्या व्यवहारास मानसिंग चव्हाण मध्यस्‍थी आहे. 

या कारणाने अपहरण
दरम्यान विठ्ठल राठोड हा पैसे घेऊन ऊसतोड कामगार पुरवत नसल्याने विठ्ठल हरी राठोड यास बाळु राठोड व रमेश राठोड हे जेवळी (ता. तुळजापुर) येथे घेऊन गेले. त्याला सोडविण्यासाठी मानसिंग चव्हाण गेला नाही; म्हणुन १३ ऑक्टोबरला अकरा वाजेच्या सुमारास पत्नी सुंनदा राठोड हिस तिन मुलींसह अर्जुन हरी राठोड, विजय राठोड, कौश्यल्याबाई राठोड, शांतीलाल राठोड यांनी क्रुझर गाडीत बसवून घेवुन गेले. भांबरवाडी (ता. कन्नड) येथे गाडीत डांबून ठेवले. बुधवारी (ता.१४) सकाळी नऊ वाजता भडगाव येथे सोडुन गेले. याबाबत मानसिंग पोपट चव्हाण यांनी पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरून अर्जुन हरी राठोड, विजय राठोड, कौश्यल्याबाई राठोड, शांतीलाल मकाराम राठोड सर्व रा. वडगाव- नालबंदी यांच्या विरुध्द अपहरण करणे, डांबुन ठेवणेबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक कीरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस हेड कॉन्स्‍टेबल कैलास गिते, पोहेका सचिन बावळे हे करीत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon kidnapping of mediator's wife in suger worker