अपहरणाचा संशय अन्‌ चिमुरड्याचा मृतदेह विहिरीत 

सुधाकर पाटील
Tuesday, 15 December 2020

भिल्ल समाजाच्या कुटुंबातील दिपक गायकवाड यांचा मुलगा आयुष दिपक गायकवाड (वय 3) हा वडगाव सतीचे येथून सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हरवला होता.

भडगाव (जळगाव) : वडगांव सतिचे (ता. भडगाव) येथील नविन वसाहत भागातील एका तीन वर्षाच्या बालकांचा मृतदेह विहरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान काल त्याच्या अपहरणाची तक्रार भडगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. त्याचा मृत्यूचे कारण काय आहे. याबाबत अजुन स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. 

हेपण वाचा- शरद पवारांच्या अपेक्षांची पंतप्रधानांकडून पूर्ती; पण विरोधक मोदीद्वेषाने पछाडले : खासदार डॉ. भामरे

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार वडगांव बु. (ता.भडगाव) येथील भिल्ल समाजाच्या कुटुंबातील दिपक गायकवाड यांचा मुलगा आयुष दिपक गायकवाड (वय 3) हा वडगाव सतीचे येथून सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हरवला होता. याबाबत भडगांव पो.स्टे. ला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याचा मुतदेह गावातील माध्यमिक शाळेजवळ दिलीप जाधव यांच्या शेतातील विहिरीत रात्री साडेदहाच्या सुमारास आढळुन आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मृत्‍यूचे कारण अस्‍पष्‍ट
बालकाचा मृत्यु कसा झाला? याबाबतचे मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र संशयित म्हणून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान घटनास्थळी रात्री अकरा वाजता पाचोरा पोलिस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे यांनी भेट दिली. यावेळी पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्यासह पो.हे.कॉ. कैलास गिते, पो.ना. लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, स्वप्निल चव्हाण, नितिन रावते उपस्थित होते.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon three year child suspicion of kidnapping but death body in well