गिरणा नदीतून भडगाव शहरासाठी ३.२९ दलघमी पाणीसाठा आरक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girna Dam

गिरणा नदीतून भडगाव शहरासाठी ३.२९ दलघमी पाणीसाठा आरक्षितभडगाव : भडगाव शहरासाठी गिरणा नदीतून (Girna River) ३.२९ दलघमी पाणी आरक्षित (Water reservation) करण्यात आले आहे. यासंदर्भात कालच राज्याच्या जलसंपदा विभागाने शासन (Department of Water Resources) निर्णय काढला आहे. त्यामुळे भडगाव शहरासाठी प्रस्तावित असलेली पाणीपुरवठा योजनेचा मंजुरीचा मार्ग निकाली निघाला आहे. आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांनी पाणी आरक्षणासाठी शासनाकडे पाठपुरवा केला होता.


महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत भडगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजना शासनाकडे प्रस्तावित आहे. त्यासाठी आश्वासक जलाशयातून पाणी आरक्षित असणे आवश्यक होते. या योजनेंतर्गत गिरणा नदीवर पक्का बंधाराही घेण्यात आला आहे. त्यातून शहरासाठी पाणी मिळणार आहे. त्यासाठी पाणी आरक्षित असणे गरजेचे होते. त्याअनुशंगाने आमदार किशोर पाटील यांनी गिरणा धरणातून शहरासाठी पाणी आरक्षित करण्याची मागणी केली होती. तर गिरणा पाटबंधारे विभागाची एनओसी ही पाहिजे होती. भडगाव पालिकेने शासनाकडे यासंदर्भात प्रस्ताव दाखल केला होता. अखेर राज्याच्या जलसंपदा विभागाने गुरुवारी (ता. ९) गिरणा नदीतून भडगाव शहरासाठी ३.२९ दलघमी एवढा पाणीसाठी आरक्षित केल्याचा शासन निर्णय काढला. त्यामुळे शहरासाठी प्रस्तावित असलेली पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता बंधाऱ्यासह पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळणे गरजेचे आहे. शासानाच्या शहरासाठी पाणी आरक्षणांच्या निर्णायाचे शहरवासियांनी स्वागत केले आहे.


शहरासाठी गिरणा नदीतून ३.२९ दलघमी पाणी आरक्षित झाल्याने पाठपुराव्याला यश आल्याचा आनंद आहे. आता लवकरच गिरणा नदीवर बंधाऱ्यासह पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-किशोर पाटील, आमदार पाचोरा- भडगाव