esakal | भुसावळला वीजबिलांची होळी; आमदारांसह नगराध्यक्षांची गैरहजेरी 
sakal

बोलून बातमी शोधा

bjp light bill holi

भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून भुसावळ भाजपत फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

भुसावळला वीजबिलांची होळी; आमदारांसह नगराध्यक्षांची गैरहजेरी 

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : येथील भाजपच्या शहर शाखेतर्फे सोमवारी (ता. २३) आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयाजवळ वीजबिलांची होळी करण्यात आली. मात्र, या आंदोलनात आमदार संजय सावकारे यांच्यासह नगराध्यक्ष रमण भोळे आणि खडसे समर्थक नगरसेवकांची गैरहजेरी दिसून आली. 
आंदोलनास भाजप भुसावळ शहर सरचिटणीस पवन बुंदेल, अमोल महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, राजू नाटकर, पिंटू कोठारी, किरण कोलते, निक्की बतरा, परिक्षित बऱ्हाटे, गिरीश महाजन, ॲड. बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी, खुशाल जोशी, प्रवीण इखणकर, सुनील महाजन, नरेंद्र पाटील, नागो पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

खडसे समर्थकांचा बहिष्कार 
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून भुसावळ भाजपत फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात भाजपची बैठक असो किंवा इतर काही उपक्रम त्यात नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह खडसे समर्थक नगरसेवक गैरहजर असतात. आजही महाआघाडी सरकारविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात खडसे समर्थक नगरसेवक अनुपस्थित होते, तर आमदार संजय सावकारे यांचीही अनुपस्थिती दिसून आली. याबाबत विचारणा केली असता, ते नाशिक येथे गेले असल्याचे सांगण्यात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे