esakal | लॉकडाउनचे आठ महिने; 6 लाख वँगन्सद्वारे 35.53 दशलक्ष टन माल वाहतूक
sakal

बोलून बातमी शोधा

railway luggage transport

उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वेळेवर वस्तू व मालपुरवठा खात्रीने पोहोचविण्यासाठी, रेल्वेने कोविड लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत.

लॉकडाउनचे आठ महिने; 6 लाख वँगन्सद्वारे 35.53 दशलक्ष टन माल वाहतूक

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेने 23 मार्च ते 18 नोव्हेंबरपर्यंतच्या लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधीत 6.72 लाख वॅगन्‍सद्वारे 35.53 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. तर अखंड वीजपुरवठा करण्यासाठी 2.62 लाखांपेक्षा जास्त वॅगन्‍सद्वारे कोळशाची वाहतूक केली आहे.

उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वेळेवर वस्तू व मालपुरवठा खात्रीने पोहोचविण्यासाठी, रेल्वेने कोविड लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत. 23 मार्च ते 18 नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने उद्योग क्षेत्राची गरज पूर्ण करीत 35.53 दशलक्ष टन मालाची वाहतूक यशस्वीरित्या केली.

दररोज अहिडच हजाराहून अधिक वॅगन्‍स
वॅगन्‍सच्या बाबतीत 23 मार्च ते 18 नोव्हेंबर पर्यंत 6 लाख 72 हजार 879 इतक्या वॅगन्‍सद्वारे माल वाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वेने कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर विविध वस्तू वाहून नेणाऱ्या 13 हजार 981 वस्तूंच्या मालगाड्या चालविल्या. या कालावधी दरम्यान दररोज सरासरी 2 हजार 792 वॅगन्स माल वाहतूक करण्यात आली.

वीजपुरवठा सह अन्न धान्याला प्राधान्य
मध्य रेल्वेने उपरोक्त कालावधीत वीजपुरवठा अखंडित व सुरळीत रहावा यासाठी कोळशाच्या 2 लाख 62 हजार 327 वाघिणीची वाहतूक विविध उर्जा प्रकल्पांसाठी करण्यात आली. तसेच अन्नधान्य आणि साखरेच्या 8 हजार 858 वाघीनींची वाहतूक केली; शेतकऱ्यांच्या हितासाठी खतांच्या 31 हजार 743 आणि कांद्याच्या 7 हजार 616 वाघिणी; पेट्रोलियम पदार्थांच्या 63 हजार 305; लोह आणि स्टीलच्या 17 हजार 349 वाघिणी; सिमेंटच्या 45 हजार 38 वाघिणी; 2 लाख 4 हजार 21 कंटेनरच्या वाघिणी आणि सुमारे 32 हजार 622 वाघिणी डी-ऑईल केक (कडबा) व संकीर्ण वस्तूंच्या वाघिणीची वाहतूक करण्यात आली.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top