esakal | पोलिसांची सर्तकता..आणि पुलावरच सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला.
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पोलिसांची सर्तकता..आणि पुलावरच सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भुसावळ : शहरात तलवार, चेन व चाकूच्या धाकावर जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघा चोरट्यांच्या (Thieves) शहर पोलिसांनी (Bhusawal City Police) मुसक्या आवळल्या. ताब्यात घेतलेल्या संशयीतांपैकी (Suspicious) एक अल्पवयीन असून शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा ( Police Case) दाखल करण्यात आला आहे.
(bhusawal city thieves robbery but before police arrest suspicious)

हेही वाचा: मुलाला वडीलांची काळजी..आणि तयार केले वीजपुरवठ्याचे डिव्हाईस


तापी पुलावर सोमवारी रात्रीच्या सुमारास काही संशयीत जबरी चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मोहंमद अली सैयद, इकबाल अली सैयद, हेड कॉन्स्टेबल सुपडा पाटील आणि कॉन्स्टेबल सचिन काटे यांना तापी पुलावर कारवाईसाठी पाठविले. यावेळी पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस उभे असलेल्या लोकांची तपासणी केली.

पाठलाग करून पकडले

यावेळी पोलिसांनी आणखी पुढे जाऊन तपासणी केली असता, पुलाजवळ काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटरसायकल (एमएच-१९, डीआर ५१५०) जवळ उभ्या असलेल्या तीन तरुणापैकी दोन मुलं अचानक फैजपुरच्या दिशेने पळु लागले. तर एक मुलगा मोटरसायकल चालु करुन पळण्याचा प्रयत्न करू लागला असता, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

हेही वाचा: गाढव,कोल्हा,उंदीर हे निघाले दगाबाज..आता मदार घोड्यावर!

चाकू, तलवार जप्त

तेव्हा त्यांच्याकडे तलवार, लोखंडी चैन आणि चाकू आढळून आला. यावेळी पोलिसांनी शुभम शेखर पाटील (वय १८, रा. अकलुज ता.यावल) राज रामचरण गुप्ता (वय १९, रा. अकलुज ता. यावल), तर पाडळसा (ता. यावल) येथील एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे तिन्ही जण चोरी करण्यासाठी भुसावळात येत असल्याचे सांगण्यात आले. जाकीर हारून मन्सुरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीतांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image