esakal | गाढव,कोल्हा,उंदीर हे निघाले दगाबाज..आता मदार घोड्यावर!
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

गाढव,कोल्हा,उंदीर हे निघाले दगाबाज..आता मदार घोड्यावर!

sakal_logo
By
रमेश पाटील


सारंगखेडा : सकाळ संध्याकाळ आकाशात ढगाळ वातावरण (Cloudy) निर्माण होते. बघता बघता पावसाचे (Rain) शिंतोडे पडतात व आता पाऊस पडेल अशा आशा पल्लवीत होतानाच पाऊस दगा देऊन निघून जातो. गाढव, कोल्हा, उंदीर हे तीनही वाहन दगाबाज निघालेत. आता १९ रोजी सुरु झालेले सूर्याचा (sun) पुष्प नक्षत्राचे (Constellation)वाहन घोडा (Horse) असून या घोडयावर शेतकऱ्यांची (Farmers) मदार आहे.

(nandurbar district farmers rain wetting by horse constellation)

हेही वाचा: लाखोचा अवैध मद्यसाठा पकडला! पिंपळनेर पोलिसांची कामगिरी


शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतांना यंदा ही पावसाने पाहीजे तशी या परिसरात साथ दिली नाही. मृगाचा गाढव बेभरवशाचा गेल्याने शेतकऱ्यांची मदार आर्द्र नक्षत्रावर होती. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असल्याने दमदार पावसाची अपेक्षा होती, परंतू दमदार पाऊस आला नाही. त्यानंतर सूर्याचा पुनर्वसू नक्षत्राचे वाहन उंदिर असल्याने पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र , हे तीन ही वाहन दगाबाज निघालेत . सोमवार ( ता.१९ ) पासून सूर्याचा पुष्य नक्षत्र प्रवेश झाला आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा असून या घोडयावर शेतकऱ्यांची मदार आहे. घोडा जर जोरात धावला नाही तर शेतकऱ्यांना उत्पन्नाचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्कीच.

हेही वाचा: बंदिस्त कालव्याचा अधिकाऱ्यांनी दिला दिशाभूल करणारा अहवाल

दुबार पेरणीचे संकट
कमी पाऊसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे . कापसाची मोड करून त्या जागेवर सोयाबीनची पेरणी केली पण कमी पावसामुळे उगवन क्षमता नसल्याने सोयाबीन पीकही मोडणीवर आले आहे. मे, जून मध्ये कापसाची लागवड केली होती. ही पीके डौलदार असल्याने पीक शेतकऱ्यांना खुणावत आहे. परंतू पाऊस समाधान कारक पडत नसल्याने पुढे हे पीक टिकेल की नाही याचा भरवसा नाही. पाऊस दमदार आला नसल्याने नाले भरून गेले नाहीत . जमीन ओलीत असल्यासारखा पाऊस असल्याने कापसाचे पीक बहरलीत. मात्र पिकांना बहर, फुले, फळे येण्याकरीता जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पुष्य नक्षत्रावर शेतकऱ्यांचा भरोसा असून या नक्षत्रात दमदार पाऊस आल्यास शेतातील पिके वाचतील अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.

loading image