esakal | कोरोना योद्धे आंदोलनाच्या पवित्र्यात
sakal

बोलून बातमी शोधा

contractbess corona yodha

संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी पद्धतीने रुजू झालेल्या सर्व आरोग्यसेवकांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी ठामपणे उभी राहील असा विश्वास सर्वांना दिला.

कोरोना योद्धे आंदोलनाच्या पवित्र्यात

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : शहर व तालुक्यातील कोविड अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि.तु. पाटील यांची वरणगावाला भेट घेत प्रशासकीय आदेशाने त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी त्याविषयी त्यांचे गाऱ्हाणे मांडले. तसेच प्रशासनाने आठवडाभरात हा प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन खेळण्याचा निर्धार कोविड अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी कोविड अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा ही 30 नोव्हेंबरला संपुष्टात येत असून फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, उपजिल्हा रुग्णालय, विमानतळ जळगाव, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा वाँर रूम जळगाव येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेवकांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर आदेशामुळे भुसावळ येथील ग्रामीण रूग्णालय मधील कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश असल्याने येथील सर्व 21 आरोग्यसेवक, डॉक्टर वॉर्डबॉय, सिस्टर,डाटा ऑपरेटर आदी यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी डॉ. नि. तु.पाटील यांची भेट घेत आपले म्हणणे मांडले.
यावेळी डॉ. नि. तु. पाटील यांनी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य संयोजक डॉ. अजित गोपछडे आणि जळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे यांचे फोनवर बोलणे करून त्यांनी जळगाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी पद्धतीने रुजू झालेल्या सर्व आरोग्यसेवकांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी ठामपणे उभी राहील असा विश्वास सर्वांना दिला.

मुदतवाढ मिळावी
डॉ. नितु पाटील यांनी यावेळी मध्य प्रदेश सरकारने तेथील सर्व कंत्राटी आरोग्य सेवकांना 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याच प्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यात देखील फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

उस्मानाबाद येथे मुदतवाढ
उस्मानाबाद आणि जळगाव जिल्हा येथील कोविड परिस्थिती बघता उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थिती ती नक्कीच जळगाव जिल्हा पेक्षा उत्तम असून तरीदेखील दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता तेथील जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यांना फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली तरी याच धर्तीवर जळगाव जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकनी जळगाव जिल्ह्यातील सर्व करोना आरोग्य सेवकांचा कार्याचा सम्मान आणि योगदान पाहता पुढील सहा महिन्यात साठी तरी मुदतवाढ देण्यात यावी.

सात दिवसात नोंद घ्यावी
सदर निर्णय 7 दिवसात न झाल्यास जळगाव जिल्ह्यातील सर्व कंत्राटी आरोग्यसेवकांना घेऊन जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल याची जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी.यावेळी निवेदन देतांना लीना पाथरवट, अरुणा मचके, राहुल चौधरी, शेख अजीम शेख अलीम,ज्योती साबळे, शिरीन तडवी, जयश्री सपकाळे, शशिकांत अहिरे आदी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे