कोरोनाग्रस्तांची बेडसाठी धावपळ..आणि आमदारांनी घेतली झाडाझडती !

आमदार सावकारे यांनी सर्व अधिकारी वर्ग आणि स्टाफ यांना जाब विचारला
bed
bedbed



भुसावळ : तालुक्यातील करोना (corona) संक्रमित रुग्णांची (patient) संख्या वाढत असल्याने ट्रामा केअर सेन्टर मधील 50 बेड हे सुद्धा ऑक्सिजन युक्त करण्यात आले. पण अतिरिक्त स्टाफ उपलब्ध नसल्याने रुग्णांची इतरत्र हॉस्पिटल (hospital) शोधण्यासाठी धावपळ होत असून बेड धूळखात पडून आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णाचे नातेवाईक थेट वार्डात ये-जा करीत असल्याची गंभीर बाब पाहून आमदार संजय सावकारे (MLA Sanjay Saavkare) यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना (Officers) धारेवर धरीत, कानउघाडणी केली.

(corona patient search beds staff neglect hospital beds empty)

bed
भाजप नेत्यांच्या धमक्यांना भुजबळ आणि मी घाबरत नाही !

याबाबत सविस्तर वृत्त असें की, आमदार संजय सावकारे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली असता, पुरेसा स्टाफ नसल्याने 50 बेड धूळखात पडून असल्याचे लक्षात आले. तसेच रुग्णालयात सुरक्षा रक्षक नसल्याने नातेवाईक बिनधास्तपणे वार्डात ये - जा करतांना त्यांनी पाहिले. ही बाब गंभीर असून, इतरही निरोगी नागरिकांना कोरोनाचे संक्रमण होऊन शहरात याचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे आमदार सावकारे यांनी सर्व अधिकारी वर्ग आणि स्टाफ यांना जाब विचारला असता, ते निरुत्तर झालेत. नातेवाईकांना समज दिली. रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. सुरक्षारक्षक यांना त्यांच्या जबाबदारीचे भान लक्षात आणून दिले.

bed
जिल्हा संचार बंदी तरी..लसीकरणासाठी सीमा उल्लंघन !

शासकीय काम अन सहा महिने थांब

महाराष्ट्र दिनी ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेन्टर मध्ये ऑक्सिजन निर्माण प्रकल्पचे उद्घाटन झाले. तेव्हा लगेच अतिरिक्त स्टाफ पाठवतो असें जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी सांगितले, आता आठवडा झाला तरी स्टाफ नसल्याने करोना संक्रमित रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती व्हावे लागत आहे. याबत आमदार संजय सावकारे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांच्याशी फोनवर बोलणे करत याबाबत जाब विचारला. पण समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. पुरेशा स्टाफ असल्यास ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा सेन्टर मिळून 100 रुग्णांना ऑक्सिजन युक्त बेड सुविधा मिळू शकते. पण शासकीय काम अन सहा महिने थांब असा हा प्रकार दिसून येत आहे.

bed
किर्तन बंद.. आणि गोशाळेतील गायींचे हाल !

"भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेन्टर मधील प्रत्येक बाबतीत जिल्हा आरोग्य प्रशासनाची दिरंगाई दिसून येत आहे. स्टाफ नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा पर्याय निवडावा लागतो. पुरेसा स्टाफ न देण्यामागे काय अर्थ आहे,हे न उलगडणारे कोड आहे, याबाबत आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार".

- आमदार संजय सावकारे,भुसावळ विधानसभा.

(corona patient search beds staff neglect hospital beds empty)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com