किर्तन बंद.. आणि गोशाळेतील गायींचे हाल !

गो शाळेत लहान मोठे जवळपास दोनशेहून अधिक देशी गायी आहेत.
cow
cowcow

मेहुणबारे : पशुधनाच्या जीवावर आपण वर्षानुवर्ष शेतजमीन कसत आहोत. त्यांच्या कष्टाच्या जोरावर संसार चालतो आणि शेतकरी (farmer) जगाचा पोशिंदा ठरतो. सद्याच्या या परस्थितीत वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रामातील गोशाळेत (cowshed) चारा (Fodder) नसल्याने गायींचे (Hungry) खुप हाल होत आहे. येथे चार्याची गरजेसाठी सामाजिक संस्था व संघटनांनी एकत्र येऊन मदतीचा (help) हात पुढे करावा असे भावनिक आवाहन गोसेवक बाबा रविदास महाराज यांनी केले आहे.

(fodder scarcity problem cow shed)

cow
आता खरीप पिकांसाठी शेती मशागतीला सुरुवात !

चाळीसगाव तालुक्यात सध्या दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा (Temperature rise) तडाखा आणि त्यात सातत्याने जाणावणारी चारा टंचाई (Fodder scarcity) , पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोहोचणे या व इतरही अनेक कारणांमुळे पशुधनाच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाली असून एकेकाळी मोठय़ा संख्येने दिसणारे गायींचे गोठे आता चार्याआभावी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रामातील गो शाळेत लहान मोठे जवळपास दोनशेहून अधिक देशी गायी आहेत.या गायीना चारा नसल्याने गायींचे खुप हाल होत आहेत.येथील वटेश्वर आश्रमातील गोशाळेत सध्या चारा नसल्याने रविदास महाराज चार्यासाठी धडपड करत आहेत.या गोशाळेत चाऱ्याची सरळ हाताने मदत करावी अशी मागणी होत आहे. गाईना चारा नसल्याने वनवन भटकंती करावी लागत आहे. चार्याअभावी गायींचे होणारे हाल पाहावत नसल्याने या गोशाळेवर दानशुर व्यक्तीनी चारा दान करावा असे आव्हान गोसेवक रविदास महाराज यांनी केले आहे.गाईना चारा उपलब्ध व्हावा यासाठी परीसरातील ग्रामस्थांनी सहकार्य करावे.जेणेकरून गाईच्या चार्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.

cow
पहाटेच्या थरारात कुटुंब रस्‍त्‍यावर; एकट्या महिलेचे धाडस

चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

वटेश्वर आश्रमातील गो शाळेतील गायींना पुरेसा चारा न मिळाल्याने काही गायी दगावल्या. यामुळे येथील चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चाऱ्याअभावी आपल्या गायी दगावल्याचे दुःख सांगताना रविदास महाराज यांचे डोळे पाणावले होते. ज्यांना विविध कारणांमुळे गायी सांभाळणे शक्य नाही,अशा अनेकांनी या आश्रमाला गायी दान केलेल्या आहेत. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी रविदास महाराज हे समाजातील दाते व ग्रामस्थांच्या सहकार्याने निष्ठेने पार पाडत आहेत.या गो शाळेत चार्याची प्रशासनाने ग्रामस्थांनी मदत करावी अशी मागणी होत आहे.

cow
राजकीय वलयातील पिता-पुत्र जोडींच्या ‘एक्झिट’

किर्तने बंद आसल्याने हाल....

वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील गोसेवक ह.भ.प.रविदास महाराज हे किर्तन करतात या कीर्तनाच्या माध्यमातून मिळणार्या मानधनाच्या पैशातुन गोशाळा सुरु आहे. मात्र या कोरानाच्या भिषण परीस्थितीत किर्तने देखील बंद असल्याने परीस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.कुणीही पैसा न देता गायींना स्वतः चारा विकत घेऊन द्यावा अशी मागणी रविदास महाराज यांनी केली आहे.

(fodder scarcity problem cow shed)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com