esakal | हतनूर धरणाचे दहा दरवाजे बंद; पावसाने घेतली उसंत
sakal

बोलून बातमी शोधा

Hatnur Dam

हतनूर धरणाचे दहा दरवाजे बंद; पावसाने घेतली उसंत

sakal_logo
By
टीम ई सकाळ


भुसावळ : विदर्भ (Vidarbha) मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) जोरदार पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या (Hatnur Dam)पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली असता हतनूर धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले होते. मात्र, आता पावसाने उसंत घेतल्याने तापी नदीपात्रात पाण्याची आवक घटली असून, पूर्पपणे उघडण्यात आलेल्या १६ दरवाजांपैकी दहा दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या आठ हजार ५१ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. ( due to rains hatnur dam six gates closed )

हेही वाचा: कोविड नसलेल्या गावात आज शाळांची घंटा वाजणार


जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने दडी मारलेली असताना मध्य प्रदेशात आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडत असल्याने तापी पूर्णा नदीला पूर आला होता. हतनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली होती. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले होते. मात्र, आता पावसाने ‘ब्रेक’ घेतल्याने बुधवारी सकाळी सहाला धरणाचे दहा दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

हेही वाचा: पिक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

मोठ्या प्रमाणात वाहून येतो गाळ

त्यामुळे सद्य:स्थितीत धरणाचे सहा दरवाजे पूर्णपणे उघडे असून, त्यातून तापी नदीपात्रात आठ हजार ५१ क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून येतो. पुराच्या पाण्यात वाहून आलेला गाळ हा सुरवातीला धरणाच्या तळाशी बसण्याचा संभव असतो. त्यामुळे सुरवातीला काही दिवस थोडा जरी पूर आला तर धरणाचे दरवाजे उघडले जातात. यामागील कारण म्हणजे हा गाळ तळाशी न बसता बाहेर फेकला जाणे गरजेचे आहे.

loading image