esakal | कोविड नसलेल्या गावात आज शाळांची घंटा वाजणार
sakal

बोलून बातमी शोधा

school

कोविड नसलेल्या गावात आज शाळांची घंटा वाजणार

sakal_logo
By
देविदास वाणी
जळगाव : कोविड (covid-19) महामारीने दीड वर्षापासून शाळा (school), महाविद्यालये (College) बंद होती. आता दुसऱ्या लाटेनंतर अनेक गावांत कोविडचे रुग्ण (corona patient) आढळत नाही. त्यामुळे तेथील शाळा, महाविद्यालये गुरुवार (ता. १५)पासून सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील सर्व तालुक्यांतील ७०८ शाळा व महाविद्यालये सुरू होणार आहेत. इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होतील.‘चला मुलांनो, शाळेत चला’ ही मोहीम राबविली जाणार आहे. तब्बल दीड वर्षानंतर शाळांची घंटा वाजणार आहे. (school bell will start today in village without corona)

हेही वाचा: दमदार पाऊस आला..आणि दुबार पेरणीचे संकट टळले

इयत्ता दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नववी व अकरावी हा पाया असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा, यासाठी ‘कोविडमुक्त क्षेत्रात’ शाळा सुरू करण्याचा शासनाचा विचार होता. त्यानुसार १५ जुलैपासून जिल्ह्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.


कोविडमुक्‍त ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारितील गावातील शाळेतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून, ठराव करून ते शिक्षण विभागाला शाळांनी पाठविले आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये बुधवारी (ता. १४) दिवसभर शाळाखोल्या धुणे, स्वच्छ करणे, विद्यार्थ्यांसाठी सर्व परिसर निर्जंतुकीकरण करणे, शाळेत विद्यार्थी आल्यानंतर सॅनिटायझर देणे, अंतराअंतराने बसविणे, एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, कसे लक्ष देईल याबाबतची तयारी ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांनी केली.

हेही वाचा: ‘सीईओं’ने केली पाहणी..शाळा इमारती नसल्याने झोपड्यांमध्ये शिक्षण

...असे आहेत नियम
* एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर
* एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे
* मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवावे
* पालकांना शाळा परिसरात प्रवेश नसेल
* विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद होईल
* शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे (उदा. वर्गांना अदलाबदलीच्या दिवशी/ सकाळी- दुपारी, ठराविक महत्त्वाच्या विषयांसाठी प्राधान्य)

असे आहे आकडेवारी...
* संभाव्य सुरू होणाऱ्या शाळा : ७०८
* विद्यार्थिसंख्या : एक लाख ६८ हजार ६७०
* शिक्षकांची नियुक्ती : नऊ हजार ४५

हेही वाचा: ज्येष्ठ, दिव्यांगाना ‘निअर टू होम’ लस द्या!

ग्रामीण भागातील कोविड नसलेल्या गावातील शाळा, महाविद्यालयात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होतील. ज्या गावांनी शाळा सुरू करावी, असे ठराव केले आहेत त्याच गावात शाळा सुरू होतील. कोरोना संसर्गाचे नियमांचे कठोर पालन शाळांमध्ये करावयाच्या सूचना दिल्या आहेत.
- बी. जे. पाटील, माध्यमिक शिक्षणधिकारी

loading image