देशातील पहिली किसान एक्सप्रेस बनली ट्रेंड सेटर

चेतन चौधरी
Tuesday, 20 October 2020

किसान रेल्वेमध्ये डाळिंब, शिमला मिरची, हिरवी मिरची, आले, लिंबू, मासे यासारख्या नाशवंत मालाची वाहतूक केली जाते.

भुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेवर सुरु झालेली भारताची पहिली किसान रेल्वे आता  ट्रेंड सेटर बनली आहे. कारण ती आता देवळाली आणि मुजफ्फरपूर दरम्यान आठवड्यातून तीन दिवस  धावत आहे.  किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे आतापर्यंत 25 फेरीच्या माध्यमातून 3893 टन मालाची वाहतूक ही भुसावळ विभागातून करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास राष्ट्रीय बाजारपेठ मिळत असून, शेतकरी सुखावला आहे.

किसान रेल्वेमध्ये डाळिंब, शिमला मिरची, हिरवी मिरची, आले, लिंबू, मासे यासारख्या नाशवंत मालाची वाहतूक केली जाते. या मालाची वाहतूक भुसावळ विभागातील देवळाली, नाशिक, लासलगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर आणि खंडवा या ठिकाणाहून वाहतूक करण्यात आली आहे. किसान रेल्वेला प्रतिसाद मिळत असून, भुसावळ विभागातून 15 आक्टोबरला 209 टन वाहतूक आणि 17 ऑक्टोबर ला 200 टन मालाची वाहतूक ही करण्यात आली आहे.

कमी खर्चात वेगवान वाहतूक
किसान रेल्वे  7 ऑगस्ट रोजी देवळाली ते दानापूर पर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत विस्तारित करण्यात आली. त्यानंतर सांगोला / पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल्वे त्रि-साप्ताहिक म्हणून चालू आहे. याला  शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची  वेगवान वाहतूक, नाशवंत वस्तूंची ताजा डिलिवरी, मालाच्या संख्येवर बंधन नाही, रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत करणारी असल्याने मोठ्या प्रमाणात  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची आशा व संधी मिळाली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal first kisan railway in india trend seter